शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
5
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
6
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
7
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
8
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
9
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
10
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
11
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
12
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
13
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
14
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
15
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
16
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
17
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
18
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
19
'आरोपी पळून जाण्याची शक्यता नाही'; ३ वर्षांच्या मुलीवरील अत्याचार प्रकरणात कोर्टाकडून केअरटेकरला जामीन
20
Marathi News LIVE: पेट्रोल आणि डिझेल कमी वापरा, खाद्यतेलाचा वापर कमी करा, ऑनलाइन शिक्षण सुरू करा; PM मोदींचे सलग दुसऱ्या आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी अकादमी येतेय दृष्टीपथात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2020 12:51 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या येथे मंजूर असलेल्या आदिवासी संशोधन ...

मनोज शेलार ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाच्या येथे मंजूर असलेल्या आदिवासी संशोधन व अध्ययन केंद्राच्या अर्थात ट्रायबल अकॅडमीच्या माध्यमातून आदिवासींची जीवनशैली, परंपरा, संस्कृती, भाषा, वस्तू यांचे संशोधन व संवर्धन होणार आहे. नंदुरबारातील टोकरतलाव शिवारातील २५ एकर जागेत हे केंद्र साकारले जाणार असून त्याचे भुमिपूजन झाले आहे. आता केंद्र आकारास कधी येते याकडे लक्ष लागून आहे.
नंदुरबार जिल्हा ७० टक्के पेक्षा अधीक आदिवासी लोकसंख्या असलेला जिल्हा आहे. जिल्ह्यातील आदिवासी संस्कृती व जीवनशैली वेगळी आणि प्राचीन आहे. या संस्कृतीचे जतन आणि संवर्धन तसेच त्यात आणखी संशोधन व्हावे या उद्देशाने कबचौ उत्तर महाराष्टÑ विद्यापीठाने नंदुरबारात आदिवासी अकादमी अर्थात आदिवासी अध्ययन केंद्र स्थापन्याचा निर्णय घेतला. या केंद्राच्या इमारतीचे भुमिपूजन चार महिन्यांपूर्वी झाले आहे. परंतु लॉकडाऊन आणि इतर कारणांमुळे प्रत्यक्ष बांधकामास अद्याप सुरूवात झालेली नाही.
२५ एकरमध्ये साकारणार
नंदुरबारातील आदिवासी अकादमी ही टोकरतलाव रस्त्यावरील १० हेक्टर अर्थात २५ एकर जागेत साकारणार आहे. तळमजला व त्यावर दोन मजले अशी इमारत साकाली जाणार आहे. त्यात तळमजल्यावर व पहिल्या मजल्यावर एकुण दोन वर्कशॉप खोल्या, दोन वर्गखोल्या, समुपदेशन केंद्र, प्रशासकीय कार्यालय आणि सामुदायीक हॉल राहणार आहे. दुसऱ्या मजल्यावर हेड आॅफ डिपार्टमेंटचे कार्यालय, संगणक कक्ष, ग्रंथालय, वस्तू संग्रहायालय, वर्कशॉप हॉल यासह इतर सुविधा राहणार आहेत.
काय असेल अकादमीमध्ये
अकादमी सहा मुद्यांवर काम करणार आहे. त्यात सिटी लाईक व्हिलेज या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवले जाणार आहे. शहरी भागात ज्या ुसुविधा आहेत त्या ग्रामिण भागात कशा सुरू करता येतील त्यावर संशोधन केले जाणार आहे. याशिवाय आदिवासी भागातील नैसर्गिक साधन संपत्ती संवर्धन व जतन यावर भर दिला जाणार आहे. आदिवासी भागातील पारंपारिक उपचार पद्धती व नवीन उपचार पद्धती एकमेकांना कशा पुरक राहतील यावर संशोधन केले जाणार आहे. दुर्मिळ वस्तू, उपकरणे, साहित्य, संशाधने यांचा संग्रह या ठिकाणी केला जाणार आहे. आदिवासी बोलीभाषा, सण, उत्सव यांचे संवर्धन, जतन व त्यांचे संशोधन होणार आहे. याशिवाय क्रीडा प्रबोधिनी देखील सुरू केली जाणार आहे.
इमारत लवकरच आकारास...
आदिवासी अकादमी अर्थात अध्ययन केंद्राच्या व्यावसायिक व समुदाय शिक्षण केंद्र इमारत लवकरच आकारास येणार आहे. यासाठी या केंद्राला विद्यापीठाने ७ जून २०१९ रोजी ५२४.८८ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली होती. ७ आॅगस्ट २०१९ रोजी त्यापैकी ३ कोटी ९९ लाख ५० हजार ३५० रुपयांची तांत्रिक मान्यता देण्यात आली.

याच प्रकल्पातंर्गत विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी युजीएफ सिलेज स्किम अंतर्गत प्रकृती इमारत बांधकाम करण्यात येणार आहे. या इमारतीसाठी विद्यापीठाने ४ सप्टेंबर २०१९ रोजी ८१ लाख ४६ हजार चार रुपयांची प्रशासकीय मान्यता दिली आहे. तर सार्वजनिक बांधकाम विभागानेही त्याला त्याच रक्कमेची तांत्रिक मान्यता दिली आहे. या इमारतीचे क्षेत्रफळ २६३.४२ चौरस मिटर राहणार आहे. इमारतीत मल्टीपर्पज हॉल आणि कॅण्टीनसह किचन राहणार आहे. त्याचेही बांधकाम लवकरच सुरू होणार आहे.

विद्यापीठाची आदिवासी अकादमी साकारली जाणार असल्याने जिल्ह्यातील तसेच खान्देशातील आदिवासी जीवनशैलीवर संशोधन होणार आहे. राज्य व देशभरातील आदिवासी संशोधक येथे येवून अभ्यास करू शकतील. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पी.पी.पाटील हे त्यासाठी आग्रही आहेत.
-डॉ.डी.एस.पाटील, केंद्र नियंत्रक अधिकारी, एकलव्य प्रशिक्षण केंद्र, कबचौ विद्यापीठ.