शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता सुरक्षा अभियान काळातच वाहतुकीचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : गेल्या आठवडाभरापासून राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : गेल्या आठवडाभरापासून राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येत आहे. या रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध कार्यक्रम घेण्यात येत आहेत. हे कार्यक्रम फक्त फोटो सेशनसाठी होत असून रस्ता सुरक्षेसंदर्भात मात्र प्रत्यक्षात काहीच अंमलबजावणी होताना दिसत नाही. अनेक वाहनधारक वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून वाहने चालवताना दिसत आहेत. तसेच शहरातील बसस्थानक, गांधी पुतळा, स्टेट बँक, मेनरोड आदी चौकांमध्ये अनेक जण वाहतुकीचे नियम मोडताना दिसून येत आहेत.आरटीओ विभाग व पोलीस प्रशासनाच्या वतीने सुरू असलेल्या रस्ता सुरक्षा सप्ताहावर ‘लोकमत’ने शहरातील विविध भागात केलेल्या सर्वेक्षणात सुरक्षा सप्ताह फक्त उद्घाटनासाठी मर्यादित असल्याचे दिसून येते. शहरातील डोंगरगाव रोडवरील खाजगी वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी दिसून येत आहेत. काही प्रवासी तर जीवाची पर्वा न करता गाडीच्या मागील बाजूस लटकून प्रवास करताना दिसून येतात. बसस्थानक परिसरात ही वाहने रस्त्याच्या कडेला न लावता भर रस्त्यात उभी केली जातात. त्यामुळे बसस्थानकातून बसेस बाहेर निघत असताना अनेकदा याठिकाणी वाहतुकीची कोंडी होऊन अपघात होतात. या परिसरात वाहतूक शाखेचे कर्मचारी असूनदेखील ते बघ्याची भूमिका घेत असल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.शहरातील गांधी पुतळा परिसरात एकेरी वाहतूक मार्ग असूनदेखील वाहनधारक नियम मोडताना दिसून येतात. डायमंड बेकरीजवळ तीनचाकी वाहनांना प्रवेशबंदी असल्याने याठिकाणी दिवसभर मोठ्या वाहनांची वर्दळ होत असल्याने वाहतुकीची कोंडी होते. सुरक्षेच्या कारणास्तव शहरात सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी असूनही दिवसभर शहरातून अवजड वाहनांची वाहतूक सुरू असल्याने याकडे संबंधित वाहतूक शाखेचे अधिकारी व कर्मचारी याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे दिसून येते.आरटीओ विभागाने एक दिवस शहरातील नवीन पोलीस ठाण्यासमोरील रस्त्यावर काही नागरिकांना रस्ता सुरक्षासंदर्भात कार्यक्रम घेत कार्यक्रमाचे फोटोसेशन झाले. मात्र संबंधित विभाग येथूनच पुन्हा माघारी फिरले. तसेच रस्त्यांवर कोणत्याही प्रकारे याविषयी जनजागृती होताना दिसत नाही. शासकीय कार्यक्रम म्हणून कार्यक्रम न करता या सप्ताहाचा उपयोग सामान्य नागरिकांना होईल अशाप्रकारे उपाययोजना प्रशासनाच्यावतीने करण्यात याव्यात.रस्ता सुरक्षा सप्ताहात पोलिसांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाºया वाहनधारकांविरूद्ध कठोर कारवाई करणे गरजेचे आहे, असे झाल्यास अपघातांची संख्या कमी होण्यास मदत होईल. नागरिकांनी स्वत:सह इतरांचे जीव धोक्यात येणार नाही यासाठी योग्य ती खबरदारी घेतली पाहिजे, असे झाल्यास वाहतुकीला शिस्त लागण्यास मदत होऊन लहान-मोठे अपघात होण्याचे प्रमाण कमी होईल आणि यातून रस्ता सुरक्षितता वाढण्यास मदत होईल.शासनाच्या आदेशानुसार राष्ट्रीय रस्ता सुरक्षा सप्ताह अभियानात वाहनधारकांना वाहतुकीच्या नियमांचे पालन व त्याविषयीच्या नियमांची सर्वसामान्यांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने अभियान राबविण्यात येते. मात्र वाहनधारकांमध्ये याविषयी जनजागृती न झाल्याने शहरातील बहुसंख्य वाहनधारक शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करीत वाहन चालवत असल्याचे चित्र आहे. तसेच खाजगी वाहतूक करणारे वाहनधारकही बेशिस्तपणे क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवून वाहतूक नियम पायदळी तुडवत आहेत. यामुळे रस्ता सुरक्षा सप्ताह राबवून नेमके काय साधले? असा प्रश्न उपस्थित होत आहे.