शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

शेवाळी-नेत्रंग महामार्गावरील वाहतूक 24 तासानंतर झाली सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2019 13:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क खापर : नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील पेचरीदेव पुलावरील खड्डय़ामध्ये अवजड मशिनरी वाहून नेणारा ट्राला शुक्रवारी सायंकाळपासून या ...

लोकमत न्यूज नेटवर्कखापर : नेत्रंग-शेवाळी राष्ट्रीय महामार्गावरील पेचरीदेव पुलावरील खड्डय़ामध्ये अवजड मशिनरी वाहून नेणारा ट्राला शुक्रवारी सायंकाळपासून या महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास क्रेनच्या सहाय्याने हा ट्रॉला काढल्यानंतर तब्बल 24 तासानंतर वाहतूक सुरळीत झाली.शुक्रवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास अहमदाबाद येथून महाराष्ट्रात कारखान्यात उपयोगात येणारे साहित्य घेऊन जात असलेला ट्राला (क्रमांक जीजे-01 सीई- 7951) पेचरीदेव येथील पुलावरील खड्डय़ात अडकल्याने व त्यावरील अवजड साहित्य एका बाजूला झाल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. हा ट्राला पुलाच्या मध्यभागी अडकल्याने मोठी वाहने ये-जा करू शकत नव्हती. केवळ मोटारसायकल व तीनचाकी रिक्षांची ये-जा सुरू होती. मोठय़ा वाहनांच्या वाहतुकीची कोंडी होऊन रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. शुक्रवारी सायंकाळी अक्कलकुवा पोलिसांनी कोराई चौफुलीवर बेरिकेट्स लावून मोठी वाहने पुढे जाण्यापासून थांबविण्यात आली होती. त्यामुळे अक्कलकुव्यार्पयत वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. तर पेचरीदेवपासून गुजरातमधील सागबारार्पयत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परिणामी वाहनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. लांब पल्ल्याच्या बसेस अक्कलकुवा येथून गुजरातमध्ये जाऊ शकत नसल्याने रस्त्यात थांबून असल्याने प्रवाशांचे हाल झाले. तर काही बसचालक मोरंबामार्गे मार्गस्थ होत असल्याने वेळ लागत होता. पुलावर अडकलेला ट्रॉला काढण्यासाठी क्रेन मागविण्यात आली. शनिवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास क्रेनच्या सहाय्याने हा ट्रॉला काढण्यात आला. त्यानंतर या महामार्गावरील वाहतूक हळूहळू सुरळीत झाली. सध्या नेत्रंग-शेवाळी महामार्ग हा तळोदा ते गुजरात सीमेवरील डोडवार्पयत अत्यंत खराब झालेला असून पावसामुळे अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने दररोज अपघात होत आहेत. त्यातच अक्कलकुवा येथील वरखेडी नदीवरील पूल व पेचरीदेव येथील पुलावरील दोन्ही बाजूचे कठडे तुटल्यामुळे अपघाताची स्थिती  निर्माण झाली आहे. याकडे  महामार्ग प्राधिकरणाने लक्ष घालून वेळीच उपाययोजना करणे गरजेचे आहे.