शहरं
Join us  
Trending Stories
1
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शारीरीक संबंध बनवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
2
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
3
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
4
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
5
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
6
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
7
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
8
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
9
एअर इंडियाला २२,००० कोटींचा ऐतिहासिक तोटा; टाटा समूह आणि सिंगापूर एअरलाईन्सकडे आपत्कालीन निधीची मागणी
10
Travel : नकाशावर छोट्या थेंबासारखा दिसतो 'हा' देश, पण आत दडलंय अथांग सौंदर्य! रामायणाशी आहे कनेक्शन
11
IPL 2026 : निक्कीचा 'निकम्मा' शो! LSG च्या २१ कोटींच्या फलंदाजाच्या खात्यात फक्त ४१ धावा
12
रोज खेळायची, मोबाईल पाहायची... १०वीच्या टॉपरने सांगितले कसे मिळाले ५०० पैकी ४९९ गुण?
13
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
14
Ashok Mittal: राघव चड्डांना हटवून ज्यांना बनवले राज्यसभा उपनेता, त्याच नेत्याच्या मालमत्तांवर ईडीच्या धाडी
15
Mental Health: तुला OCD आहे का?' – असं कोणालाही गमतीने म्हणण्यापूर्वी हा लेख नक्की वाचा!
16
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
17
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
18
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
19
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
20
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
Daily Top 2Weekly Top 5

दरडी कोसळल्याने सातपुडय़ातील वाहतूक ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2019 12:39 IST

लोकमत न्यूज नेटवर्क वाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी रस्त्यावरील देवगोई घाट, भराडीपादर ते कुवा यासह अतिदुर्गम भागातील घाट सेक्शनच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कवाण्याविहीर : अक्कलकुवा तालुक्यातील मोलगी रस्त्यावरील देवगोई घाट, भराडीपादर ते कुवा यासह अतिदुर्गम भागातील घाट सेक्शनच्या रस्त्यांवर संततधार पावसामुळे दरडी कोसळून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने रस्त्यावर पडलेले दगड व मातीचा मलबा तात्काळ उचलून रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करण्याची मागणी होत आहे.अक्कलकुवा ते मोलगी रस्त्यावरील देवगोई घाटात रविवारी रात्री मुसळधार पावसामुळे दरड कोसळून रस्त्यावर दगड व माती पडली आहे. दगड व मातीच्या मलब्यामुळे या घाट सेक्शन रस्त्यावर वाहनधारकांना अनेक समस्यांना सामोरे जात वाहने न्यावी लागत आहे. भराडीपादर ते कुवा या घाट सेक्शनच्या रस्त्यावर आदरबारीच्या वरील भागात पावसामुळे रविवारी दोन-तीन ठिकाणी दरड व मातीच्या मलबा कोसळून पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. गेल्या गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असल्याने सातपुडय़ाच्या घाट सेक्शनच्या रस्त्यांवर दरड व मातीचा मलबा कोसळण्याच्या घटना सुरुच असून खापर, रायसिंगपूर, भराडीपादर, कुवा या रस्त्यांवरील वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. काही ठिकाणी तर वाहतूकच ठप्प झाली आहे. दरड कोसळून रस्त्यावर पडलेले मोठमोठे दगड व मातीचा मलबा संबंधित विभागाने तातडीने उचलून रस्ता वाहतुकीसाठी सरळीत करण्याची मागणी डाबचे उपसरपंच धिरसिंग फुसा वळवी, कंकाळामाळ येथील रायसिंग वळवी यांच्यासह त्रस्त वाहनधारकांनी केली आहे.दरम्यान, पावसाळ्यात दरवर्षी घाट सेक्शनच्या रस्त्यांवर दरडी कोसळून वाहतुकीला अडथळा निर्माण  होतो. रस्त्यावर पडलेले दगड व         माती काही ठिकाणी वर्षभर उचलली जात नाही. परिणामी वाहनधारकांचे हाल होतात. त्यामुळे संबंधित विभागाने दरड कोसळल्यानंतर तातडीने दगड व माती उचलण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज आहे.

अक्कलकुवा-मोलगी रस्त्यावर देवगोई घाटाच्या खाली शनिवारी मध्यरात्री पावसाच्या संततधारेमुळे  तीन ते चार ठिकाणी झाडे रस्त्यावर उन्मळून पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. याठिकाणी वाहनधारकांना वाहने वळवून काढावी लागत आहे. गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरु असल्याने अक्कलकुवा ते मोलगी रस्त्यावर देवगोई घाटात शनिवारी मध्यरात्री पावसामुळे तीन-चार ठिकाणी झाडे रस्त्यावर उन्मळून पडल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. रस्त्यावर उन्मळून पडलेली ही झाडे वाहनधारकांना त्रासदायक ठरत असून संबधित विभागाने ही झाडे सरकवून वाहतूक सुरळीत करण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे.