शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

शहाद्यातील वाहतूक नियंत्रण कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2020 10:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा :  शहरातील वाहतूक नियंत्रण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. बसस्थानक परिसर ते नगरपालिका चौकापर्यंत हातगाडीधारकांसह अवैध ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा :  शहरातील वाहतूक नियंत्रण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. बसस्थानक परिसर ते नगरपालिका चौकापर्यंत हातगाडीधारकांसह अवैध प्रवासी वाहतुकीची वाहने रस्त्यावर उभी राहतात. वाहने सुसाट नेली जातात. पोलिसांचा धाक संपला असल्याचे चित्र दिसून येत आहे. पालिका व पोलीस प्रशासन यांच्यातील समन्वयाच्या अभावामुळे वाहतुकीचा प्रश्न सुटण्याऐवजी दिवसेंदिवस जटील होत आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची गरज आहे. परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक तथा प्रभारी पोलीस निरीक्षक एम. रमेश यांनी दखल घेऊन कठोर पावले उचलावी, अशी अपेक्षा शहरवासीयांकडून व्यक्त केली जात आहे.           वाहतुकीची कोंडी नित्याचीच बाब ठरली आहे. शहरातील सर्वाधिक रहदारी असणाऱ्या रस्त्यांवर सर्वाधिक वाहतुकीची कोंडी असते. चोहोबाजूंनी शहरात येण्यासाठी व शहरातून बाहेर जाण्यासाठी याच मार्गाचा प्रामुख्याने वापर केला जातो. दोंडाईचा रस्ता, डोंगरगाव रस्ता तसेच खेतिया रस्ता शहरातून जातो. याच मुख्य मार्गावर हातगाडीधारकांची मनमानी वाहतूक कोंडीची मुख्य समस्या आहे. शहरात हॉकर्स झोन नाही. फेरीवाले विक्रेत्यांसाठी ठराविक जागा नसल्याने फेरीवाले विक्रेत्यांचा मनमानी कारभार सुरूच आहे. भाजी मंडईव्यतिरिक्त फेरीवाले विक्रेते तहसील कचेरी परिसर, बसस्थानक व डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा कॉर्नर, भाजी मंडई प्रवेशद्वार, महात्मा गांधी पुतळा चौक, नगरपालिका चौक, डायमंड कॉर्नर, महात्मा फुले पुतळा परिसर आदी भागात रस्त्याच्या दुतर्फा हातगाडीधारक उभे राहतात. भररस्त्यात हातगाडी उभी करून फळे व भाजीपाला विक्री करणाऱ्या हातगाडीधारकांमुळे दिवसभरातून अनेकदा वाहनांची रांग लागते. वाहतुकीच्या कोंडीमुळे वाहनचालकांमध्ये हमरीतुमरीचे प्रसंगही उद्‌भवतात.            दुचाकीवर अल्पवयीन मुले-मुली सुसाट झाले आहेत. केंद्रीय वाहतूक विभागाने वाहतुकीची नियमावली कठोर केली आहे. याची अंमलबजावणीची जबाबदारी वाहतूक पोलीस व आरटीओ विभागाला दिली आहे; मात्र या दोन्ही विभागातून सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने वाहनचालक वाहतूक नियमांची पायमल्ली करीत असतात. दुचाकी व चारचाकी वाहनधारक सुसाट वेगाने वाहने पळवितात. वास्तविक बाजारपेठेत वाहनांचा वेग मर्यादित ठेवणे गरजेचे आहे; मात्र दुचाकीवर तीन सीट बसवून जोरात कर्णकर्कश हॉर्न वाजवत अल्पवयीन मुले वाहन चालवत असल्याचेही चित्र नेहमीचे झाले आहे. शाळा-महाविद्यालयीन मुले सुसाट वेगात वाहन चालवत असून, अपघाताच्या घटनाही घडत आहेत.

एकमार्गी वाहतूक उरली नावाला...        शहरात एकमार्गी वाहतूक फक्त नावालाच उरली आहे. शहरात वाहतूक व्यवस्था सुरळीत असावी, यासाठी मोजके दोन तीन वन-वे आहे. सकाळी आठ ते रात्री आठ वाजेदरम्यान स्टेट बँक चौकापासून शहरात अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे; मात्र दिवसभर अवजड वाहनांची वाहतूक शहरातून सुरू असल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होते. कायमस्वरूपी उपाययोजनांऐवजी केवळ बैठका झाल्या असल्याने ठोस कारवाई केली जात नाही. शहरातील वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनातर्फे वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत; मात्र या पोलिसांसमोरच अल्पवयीन शालेय विद्यार्थी - विद्यार्थिनी दुचाकी सुसाट वेगाने पळवत असून, अवैध प्रवासी वाहतुकीची वाहने क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी बसवून नेले जात आहे. परिणामी, वाहतूक पोलीस शहरात करतात तरी काय, याचा शोध पोलीस प्रशासनाने घेणे गरजेचे आहे. केवळ एक दिवस कारवाई करून, बैठका घेऊन ही गहन समस्या सुटणार नाही तर यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी निर्णायक भूमिका घेणे काळाची गरज आहे.