शहरं
Join us  
Trending Stories
1
Jabalpur Cruise Boat Capsized: जबलपूरमध्ये मोठी दुर्घटना, बर्गी धरणात पर्यटकांची क्रूझ उलटली; ९ जणांचा मृत्यू
2
महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाने मराठी शिकलीच पाहिजे; पण भाषेच्या नावावर हिंसा नको: फडणवीस
3
PSL मध्ये कॉमेंट्री बॉक्समध्येच रमीझ राजानं महिला समालोचकाचं घेतलं चुंबन, व्हिडीओ व्हायरल     
4
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
5
पाकिस्तानला जाणारं जहाज महाराष्ट्रातच थांबवलं; ना माल उतरवणार, ना जागचं हलणार; कारण काय?
6
Raja Shivaji: डोक्यावर भगवा फेटा अन् पिळदार मिश्या, 'राजा शिवाजी'मधील सलमानची झलक समोर
7
1st May Changes : एलपीजी सिलिंडरचे दर ते क्रेडिट कार्ड, युपीआय ते एटीएम; आजपासून काय काय बदललं? थेट खिशावर होणार परिणाम
8
मुंबई-पुणे मिसिंग लिंकची गिनीज बुकमध्ये नोंद; महाराष्ट्र दिनी आज होणार लोकार्पण, प्रवास आणखी वेगात
9
कोणाच्या दबावाने यूएईने ‘ओपेक’ची साथ सोडली?; अरब देशांच्या सामूहिक शक्तीला मोठा तडा
10
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
11
तेल तापल्याने रुपयाची विक्रमी वाताहत! सर्वसामान्यांवर महागाईचं संकट; जीवनावश्यक वस्तू महागणार
12
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
13
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
14
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
15
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
16
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
17
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
18
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
19
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
20
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
Daily Top 2Weekly Top 5

१०० वर्षापासून पारंपरिक बैलगाडी बाजारही तग धरुन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 13:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : सोरापाडा येथील श्री कालिका मातेच्या यात्रोत्सवाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत़ त्यासोबत येथे होणारा ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : सोरापाडा येथील श्री कालिका मातेच्या यात्रोत्सवाला शंभर वर्ष पूर्ण होत आहेत़ त्यासोबत येथे होणारा ऐतिहासिक बैलबाजार आणि पारंपरिक बैल गाडींचा बाजारही फुलला असून यंत्रयुगातही बैलगाड्या खरेदीला ग्राहक येथे येत असल्याने व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे़ दरम्यान बैलबाजारात सोमवारी सात हजार बैलांची विक्री होऊन तीन कोटी रुपयांची उलाढाल झाली़कालिका माता हे जागृत देवस्थान म्हणून परिचित आहे़ येथे दरवर्षी माघ पौर्णिमेपासून यात्रोत्सवाची परंपरा आहे़ जागृत देवस्थान असल्याने भाविकांनी पहिल्याच दिवशी शेकडोंच्या संख्येने हजेरी देत दर्शन घेतले होते़ एकीकडे भाविकांची यात्रेत गर्द वाढत असताना पारंपरिक बैलबाजारही फुलला आहे़ १०० वर्षांपूर्वी मंदिराची स्थापना झाल्यानंतर काही वर्षांनंतर येथे यात्रोत्सव आणि बैलबाजाराला प्रारंभ झाला़ सातपुड्यातील गावठी बैल शेती कामांमध्ये तरबेज व काटक असल्यामुळे त्यांच्या खरेदीसाठी येथे शेतकरी आणि व्यापारी हजेरी लावतात़ जिल्ह्यासह गुजरात राज्य व महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील शेतकरी आणि व्यापारी येथे सोमवारीही दाखल झाले होते़ एवढ्या दीर्घ कालावधीनंतरही बैल बाजार आणि त्यासोबत बैलगाडी बाजार टिकून असल्याने त्या-त्या व्यावसायिकांचे व्यवसाय आजही सुरु असल्याचे चित्र यंदाही शाबूत आहे़ यांत्रिकी शेतीला प्राधान्य दिले गेल्याने बैलगाडी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे़ ग्रामीण भागात शोभेची वस्तू म्हणून बैलगाडी पडून असल्याचे दिसून येते़ यातून कधीकाळी मोठी मागणी असलेल्या बैलगाडी दिसून येत नसल्याचे चित्र आहे़ मागणी कमी झाल्याने बैलगाडी तयार करणाऱ्यांचे व्यवसाय डबघाईस आले आहेत़ बºयाच यात्रोत्सवांमध्ये बैलगाडीचे बाजार पूर्णपणे बंद झाले असले तरी अक्कलकुव्यात मात्र बैलगाडी तयार करुन विक्री करण्याचा व्यवसाय तेजीत आहे़ याठिकाणी यंदाही दोन ते तीन विक्रेत्यांनी लाकडी आणि लोखंडी बैलगाड्या तयार करुन आणल्या आहेत़ या व्यवसायात स्पर्धा वाढली असल्याने बैलगाडीचे दर कमी झाले आहेत़ बैलांच्या किमतीत वाढ होत असताना बैलगाडीचे दर परवडणारे नसल्याने व्यावसायिक चिंतेत आहेत़ यात्रेचे संयोजन श्री कालिका माता मंदिराचे विश्वस्त मंडळ करीत असून दोन दिवसात मोठ्या संख्येने याठिकाणी भाविकांनी हजेरी लावली आहे़ यात्रोत्सवासाठी अक्कलकुवा पोलीसांनी बंदोबस्त तैनात केला आहे़सोमवारी बैलबाजारात २० हजार बैलांची आवक झाली होती़ यातून सात हजार बैलांची विक्री होऊन तीन कोटी १० हजार रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती बाजार समितीचे सचिव दीपक हिरे यांनी दिली़ यातील सर्वाधिक महागडी बैलजोडी ही १ लाख १० हजार रुपयांना विक्री करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे़दरम्यान येथे एका बैलगाडीची किंमत ही २० हजार रुपयांपर्यंत आहे़ प्रामुख्याने तळोदा आणि पारोळा येथील कारागिरांनी बैलगाडी विक्रीसाठी आणल्या आहेत़ मजबूत लाकडासह लोखंडी चाके असलेल्या बैलगाडींचीही विक्री करण्यात येत आहे़ गेल्या दोन दिवसात एखाद दुसºया ग्राहकाने येथे भेट दिली असल्याचे सांगण्यात आले आहे़ येथून प्रामुख्याने गुजरात राज्यातील शेतकरी बैलगाडींची खरेदी करतात़ अद्याप त्यांनी येथे हजेरी लावतात़