शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

लाॅकडाऊनमुळे टळतोय रेल्वे प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्यात लाॅकडाऊन सुरू असल्याने प्रवासी वाहतूक व्यवस्था बंद आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे वाहतूक सुरू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नंदुरबार : राज्यात लाॅकडाऊन सुरू असल्याने प्रवासी वाहतूक व्यवस्था बंद आहे. या पार्श्वभूमीवर रेल्वे वाहतूक सुरू असली तरी प्रवासी नकार देत असल्याने ऐनवेळी तिकिटे रद्द होणे सुरूच आहे. यातून रेल्वेस्थानकातही शुकशुकाट आहे.

नंदुरबार रेल्वेस्थानकातून सप्ताहात साधारण ३९ प्रवासी गाड्या सध्या मार्गस्थ होत आहेत. यातील सहा गाड्या या दैनंदिन आहेत. या व्यतिरिक्त साप्ताहिक गाड्या धावत असल्याने जळगाव-उधना मार्गावरील नंदुरबार रेल्वेस्थानकात नियमित वर्दळ असते. परंतु लाॅकडाऊनमुळे ही वर्दळ कमी झाली असून नागरिक प्रवास करणे थांबवत असल्याने दर दिवशी तिकिटे रद्द करण्यात येत आहेत. दक्षिण भारतासह नागपूर मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांची तिकिटे रद्द करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली आहे. गुजरात राज्यात प्रवास करणाऱ्यांची संख्या मात्र कायम असून गुजरातमधून येणाऱ्यांची गर्दी मात्र कमी झाल्याचे सांगण्यात आले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रेल्वेने मेमो व पॅसेंजर रेल्वेगाड्याही बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याने केवळ एक्स्प्रेस व सुपरफास्ट गाड्या सध्या उधना-जळगाव मार्गावर धावत आहेत. या गाड्यांमधून थेट मोठ्या शहरांमधून प्रवास करणे शक्य होत असल्याने छोट्या स्थानकांवरील प्रवाशांचा रेल्वे प्रवासही थांबला असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

रोज रेल्वेतून प्रवाशांची संख्या

दररोज जाणाऱ्या रेल्वे

आरक्षण रद्द करणाऱ्यांची रोजची संख्या

लांब पल्ल्याचा प्रवास थांबा

नंदुरबार जिल्ह्यातून गुजरात राज्यात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी होती. उधना-जळगाव मार्गावरचे प्रमुखस्थानक असल्याने गुजरात राज्यातून दक्षिण भारताकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी होती. परंतु गेल्या एक महिन्यात कोरोनाचा संसर्ग वाढल्याने देवदर्शनासह पर्यटनासाठी जाणाऱ्यांचा प्रवास थांबला आहे.

यामुळे हावडा-अहमदाबाद, नवजीवन, ताप्तीगंगा यासह इतर गाड्यांना सहज आरक्षण मिळत असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कोरोनापूर्वी लग्नसराईत तोबा गर्दी उसळणाऱ्या नंदुरबार रेल्वेस्थानकात सध्या शुकशुकाट आहे. रेल्वे आरक्षणाच्या चार्टमध्येही वाढ नसल्याचे सांगण्यात आले आहे. अत्यावश्यक म्हणून प्रवास करणारे १०० च्या जवळपास प्रवासी बुकिंग करत असल्याचे सांगण्यात आले.

रद्द करणे वाढले

तिकीट रद्द करण्यात स्थानिक प्रवाशांची मोठी संख्या आहे. कोरोना आणि लाॅकडाऊन यामुळे उत्तर प्रदेश आणि बिहार राज्यातील काही मजूर गावाकडे गेले होते. या मजुरांकडून गेल्या आठवडाभरापर्यंत बुकिंग करण्यात आल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, इतर कामानिमित्त गेलेल्या १५० पेक्षा अधिक जणांनी गेल्या आठवड्यापासून बुकिंग रद्द केल्याची माहिती दिली गेली.

तिकीट विक्री झाली कमी

n दरम्यान, एकीकडे बुकिंग रद्द होत असताना तिकीट पॅसेंजर आणि मेमो गाड्या बंद असल्याने दैनंदिन तिकीट विक्रीवर परिणाम झाला आहे. दिवसभरात केवळ १० टक्केच जनरल सीटसाठीच्या तिकिटांची विक्री होत असल्याचा दावा नंदुरबार येथील रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून यावेळी करण्यात आला आहे.