शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षानंतर रेल्वे बोगद्याच्या कामस सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 11, 2020 13:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शहरातील वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणावर सोडविण्यास मदत करणारा नळवा रस्त्यावरील रेल्वे बोगद्याचे काम अखेर ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शहरातील वाहतुकीची समस्या मोठ्या प्रमाणावर सोडविण्यास मदत करणारा नळवा रस्त्यावरील रेल्वे बोगद्याचे काम अखेर तीन वर्षानंतर सुरू झाले आहे. ठेका देण्यात आलेल्या कंपीनीने तीन वर्षांपूर्वीच रेडीमेड बोगदा तयार करून ठेवला असतांना रेल्वे परवाणगी देत नसल्यामुळे तो संबधीत जागेवर बसविला गेला नव्हता. आता या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. यामुळे शहरवासीयांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.शहरातून गेलेल्या रेल्वे मार्गामुळे शहराचे दोन भागात विभाजन झाले आहे. पूर्वी रेल्वे गेटमुळे वाहतुकीचा ताण होता. परंतु १२ वर्षांपूर्वी उड्डाणपुल बांधण्यात आल्यानंतर थोडीफार समस्या सुटली आहे. उड्डाणपुलासह नळवा रस्त्यावर बोगद्याच्या खालून देखील वाहतूक केली जाते. परंतु एकच बोगदा असल्यामुळे एकाचवेळी दोन वाहने जाऊ शकत नाहीत. शिवाय चारचाकी वाहनांना देखील मर्यादा असतात. त्यामुळे या रस्त्यावर दुसरा बोगदा असावा यासाठीची मागणी करण्यात येत होती. सहा वर्षांपूर्वी त्याला मंजुरीही मिळाली, परंतु निधी वर्ग होत नव्हता.माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी आघाडी शासन काळात त्यासाठी निधी मंजुर करून घेतला होता. चार वर्षांपूर्वी बोगदा कामाची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यानुसार नाशिक येथील एका कंपनीला हे काम मिळाले. कंपनीने सर्व्हे करून कामाला सुरुवात केली व रेडीमेड बोगदा तयार झाला. गेल्या तीन वर्षांपासून हा बोगदा तयार होऊन धुळखात पडला होता. त्याच्या आजूबाजू मोठ्या प्रमाणावर गवत व झाडे उगली होती. हा बोगदा रेल्वे रुळाखाली बसविण्यासाठी मात्र रेल्वे विभागाकडून त्या कामाला मंजुरी दिली जात नव्हती. अखेर गेल्या महिन्यात रेल्वेने परवाणगी दिली आहे. त्यानुसार आता कामाला सुरुवात करण्यात आली आहे.पुढच्या आठवड्यात तयार झालेले दोन्ही बोगदे हे ठरलेल्या जागेत बसविण्यात येणार आहेत. त्यासाठी रेल्वेचा ब्लॉक घेणे गरजेचे नसल्याचे संबधितांनी सांगितले. यासाठी सुरुवातीला रेल्वे रुळाखालील भरावातून गेलेले केबल, ड्रेनेज लाईन, पाईप लाईन आदी हलविले जात आहे. या कामाला आठ दिवस लागण्याची शक्यता आहे. यामुळे सध्या असलेल्या बोगद्याच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर घाण पाणी वाहत आहे. यामुळे रहदारी वारंवार विस्कळीत होत आहे.या ठिकाणी कच्चे व पक्के अतिक्रमण देखील झाले आहे. ते काढणे देखील गरजेचे ठरणार आहे. त्यासाठी संबधितांना सुचना देण्यात आली. लवकरच हे अतिक्रमण काढण्यात येणार आहे. त्यानंतर हा रस्ता विस्तृत करून पालिकेतर्फे डांबरीकरण किंवा काँक्रीटीकरण करण्यात येणार आहे.

नवीन बोगदा झाल्यास दुचाकी व चारचाकी वाहनधारकांना ते सोयीचे ठरणार आहे. आधीच बोगदा ते थेट नळवा हद्दीपर्यंत रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येवून मध्ये दुभाजक व पथदिवे लावण्यात आले आहेत. दुसरा बोगदाही झाल्यास या रस्त्याच्या सौंदर्यकरणात वाढच होणार आहे.या बोगद्यासाठी व कामासाठी काहींनी विरोध केला होता. त्यासाठी रेल्वेकडे तक्रारी देखील करण्यात आल्याचे समजते. परंतु सर्व तक्रारी निकाली काढण्यात आल्या होत्या. त्यामुळे कामाला लवकरच गती मिळेल अशी अपेक्षा असतांना तब्बल तीन वर्षाचा कालावधी लोटला.या बोगद्यामुळे उड्डाणपुलावरील वाहतुकीचा ताण बऱ्याच प्रमाणात कमी होणार आहे. याशिवाय पावसाळ्यात बोगद्याखाली साचणारे पाणी आता साचणार नाही. शिवाय दोन्ही बाजूंनी येण्याजाण्यासाठी सोय असल्याने वाहतूक सुटसूटीत होणार आहे.