शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
2
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
3
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
4
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
5
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
6
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
7
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
8
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
9
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
10
भारत-न्यूझीलंडदरम्यान ऐतिहासिक ट्रेड डीलवर शिक्कामोर्तब! ७०% भारतीय सामानांवर ड्युटी नाही, जाणून घ्या
11
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
12
Jara Hatke: शहाळ्याची मलई की गोड पाणी? तुमची निवड कधीच चुकणार नाही; जाणून घ्या सिक्रेट!
13
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
14
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
15
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
16
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
17
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
18
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
19
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
20
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
Daily Top 2Weekly Top 5

निर्भया निधीतून वर्षभरात ४० पिडितांना मिळाला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 11:53 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या महिला, युवती आणि लहान बालिका यांना निर्भया निधींतर्गत आर्थिक सहाय्य ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : लैंगिक अत्याचाराला बळी पडलेल्या महिला, युवती आणि लहान बालिका यांना निर्भया निधींतर्गत आर्थिक सहाय्य देऊन त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न विधी व सेवा प्राधिकरणकडून करण्यात आला आहे़ यंदाच्या वर्षात प्राधिकरणने ४० प्रकरणे निकाली काढली आहेत़महिला आणि बालकल्याण विभागाकडून चालवण्यात येणारी मनोधैर्य योजना दोन वर्षांपूर्वी विधी व सेवा प्राधिकरणकडे वर्ग करण्यात आली़ योजनेची रचना त्याच प्रकारे ठेवत पोलीस दल आणि न्यायव्यवस्था यांच्यातील समन्वय साधता यावा यासाठी ही प्रक्रिया करण्यात आली होती़ यातून २०१९-२० या वर्षात तब्बल ४० प्रकरणे जिल्हा व प्रमुख न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडे दाखल करण्यात आली होती़ समितीत विधी प्राधिकरणचे सचिव, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा पोलीस अधिक्षक यांच्यासह महिलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा समावेश असल्याने वेळावेळी प्रकरणांवर चर्चा होऊन ती निकाली काढण्यात आली़ अल्पवयीन बालिकांसोबत अत्याचार करणाऱ्यांवर पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल झाल्यानंतर पिडितांना १० लाख रुपयांपर्यंत निधी वितरीत करण्यात आला आहे़समितीकडे वेळावेळी आलेल्या प्रकरणांवर निकाल दिले गेल्यानंतर पिडितांना मदत होण्यासोबतच दोषींवरनाही शिक्षा देण्याची कारवाई करण्यात आली आहे़ मनोधैर्य योजनेतून पिडितांना करण्यात आलेली मदत ही निर्भया निधीतून झाल्याची माहिती देण्यात आली आहे़जिल्ह्यात गेल्या वर्षात लैंगिक अत्याचाराचे सर्वाधिक प्रकार घडले असून यात महिला आणि अल्पवयीन बालिकांचा समावेश आहे़ गेल्या आठवड्यात तीन प्रकरणांवर चर्चा करण्यासाठी समितीने बैठक बोलावून त्यातील पिडितांना न्याय देण्याची प्रक्रियाही सुरु केली आहे़४न्यायपालिकेकडून जिल्ह्यातील सर्व ४० पिडितांना करण्यात आलेली मदत ही दोन टप्प्यात केली गेली आहे़ या रकमेतून पिडित महिला ह्या आत्मनिर्भर व्हाव्यात यावर भर दिला जात आहे़ त्यासाठी त्यांना विविध प्रकारे मार्गदर्शन करण्यात आल्याची माहिती आहे़४प्रमुख न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील समितीची बैठक वेळोवेळी घेऊन प्रकरणांची सत्यता तपासून पाहिली जाते़ पिडितेला कमीतकमी वेळेत न्याय मिळावा यावर चर्चा करण्यात येते़ यात पोलीस दलांची भूमिका सर्वाधिक महत्त्वपूर्ण ठरली असून पोलीस अधिक्षक यांच्या मार्गदर्शनात स्वतंत्र पोलीस निरीक्षक दर्जाचा अधिकारी नेमून पिडितांना न्याय दिला आहे़४मनोधैर्य सोबतच कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळ अधिनियमांतर्गत तक्रार निवारण समितीनेही विविध प्रकरणे मार्गी लावली आहेत़