शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
2
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
3
टॅक्स बचतीसाठी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी फायद्याची? 'ही' एक गोष्ट तुमच्यासाठी ठरू शकते डोकेदुखी
4
पुढील ५ दिवस देशभरात पावसाचे सावट; ७२ तास तीव्र वादळी वारे वाहणार, हवामान विभागाचा अलर्ट
5
मुंबईत 'त्या' हॉटेलमध्ये भरायचा ‘व्हीआयपी’ दरबार; मनोहरमामाच्या भक्तांची यादी पोलिसांच्या रडारवर
6
'काकी आय लव्ह यू', म्हणणं टवाळखोरांना पडलं महागात, तरुणीने भररस्त्यात शिकवला धडा
7
तेहरानमध्ये भीषण संकट! इंधन टाक्यांच्या स्फोटात ८ कोटी लीटर तेल वाया; राज्यपालांचे नागरिकांना महत्त्वाचे आवाहन
8
आधी बिर्याणी, मग कलिंगड खाल्लं... मुंबईतील एकाच कुटुंबात चौघांचा मृत्यू, घटनेमुळे खळबळ
9
IPL 2026: अंगक्रिश रघुवंशीने रागाच्या भरात ओलांडली सीमा, BCCIने दिला कठोर कारवाईचा दणका
10
किंडरगार्टनमध्ये घुसत असलेल्या सापाशी भिडला 'काली', प्राण देऊन वाचवला ३० मुलांचा जीव
11
प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...
12
अनिल अंबानींच्या 'या' कंपनीचा शेअर ४८% नं वधारला; ३० रुपयांच्या वर पोहोचला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
13
३४९,३९९ चे रिचार्ज नाही, २० रुपयांचा बॅलन्स तुमचे सिम कार्ड ठेवणार अॅक्टिव्ह...! ट्रायने सर्वच कंपन्यांना घालून दिलाय हा नियम...
14
भारताला हरवण्यात अपयशी ठरल्याने पाकिस्तानचा अफगाणिस्तानशी संघर्ष; अहवालातून खळबळजनक माहिती
15
Watch Video: टिम डेव्हिड, रोमारियो शेफर्ड यांनी चाहत्यांसोबत खेळलं 'गल्ली क्रिकेट', व्हिडीओ व्हायरल!
16
रेकॉर्डब्रेकर रिंकू, IPL मध्ये रचला 'असा' विक्रम, युवराज, जडेजाही पडले मागे, मोडणं आहे कठीण 
17
'चला हवा येऊ द्या'च्या दुसऱ्या सीझनमध्ये परत तीच टीम का नव्हती? श्रेया बुगडे म्हणाली...
18
बिहारमध्ये मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांच्या घराच्या पायऱ्या तोडल्या; बुलडोझर कारवाई बेधडक सुरु
19
Swapna Shastra: भीतीदायक स्वप्नांचा असतो भविष्याशी संबंध? नक्की काय सांगतं स्वप्न शास्त्र?
20
मराठी सक्ती निर्णयाची अंमलबजावणी ६ महिने ते १ वर्ष पुढे ढकलावी; संजय निरुपमांची नवी मागणी
Daily Top 2Weekly Top 5

वर्षभरात बदलले तीन पोलीस निरीक्षक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:32 IST

कोठार : वर्षभरापासून तळोदा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक टिकत नसल्याचे चित्र असून, काही महिन्यांतच अधिकारी दुसऱ्या पोलीस ठाण्यात बदलून ...

कोठार : वर्षभरापासून तळोदा पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक टिकत नसल्याचे चित्र असून, काही महिन्यांतच अधिकारी दुसऱ्या पोलीस ठाण्यात बदलून जात आहेत. गेल्या वर्षभरात तीन पोलीस निरीक्षक बदलून गेले आहेत.

गेल्या वर्षी १९ मे रोजी तत्कालीन पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण यांची बदली झाली होती. त्यानंतर राजेश शिंगटे यांची नियुक्ती तळोदा पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी करण्यात आली होती. शिंगटे रुजू झाल्यापासून त्यांच्या बदलीबाबत अंदाज लावण्यात येत होते. अखेर १ नोव्हेंबर रोजी त्यांची अक्कलकुवा पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी बदली झाली. त्यांचा कार्यकाळ केवळ सहा महिन्यांच्या राहिला. त्यानंतर त्यांच्या जागी ६ नोव्हेंबर रोजी नंदराज पाटील यांची तळोदा पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदी नेमणूक झाली. परंतु त्यांचा कार्यकाळदेखील खूपच अल्पजीवी ठरला. अवघ्या चार महिन्यात फेब्रुवारी अखेरीस त्यांची बदली झाली व त्यांच्या जागी पंडितराव सोनवणे यांच्यावर मागील मार्च महिन्यापासून तळोदा पोलीस ठाण्याच्या निरीक्षकपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. म्हणजे अवघ्या वर्षभरात तळोदा पोलीस ठाण्यात तीन पोलीस निरीक्षक बदलले गेले आहेत. सोनवणे यांची नियुक्तीदेखील फार काळ राहणार नसून, येणाऱ्या काही दिवसात त्यांचीदेखील बदली होईल, अशी चर्चा आहे. त्यामुळे त्यांचा कार्यकाळदेखील किती महिन्यांचा ठरेल हे अद्याप तरी निश्चित नसल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, वर्षभरात तीन पोलीस निरीक्षक बदलले गेल्याने पोलीस प्रशासनाच्या कारभारात मागील वर्षभरापासून सुसूत्रता नसल्याचे चित्र आहे. नवीन अधिकारी रुजू होऊन शहरासह संपूर्ण तालुक्याची कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती समजून घेत नाही, तोच त्याची बदली होत आहे. नवीन रुजू होणाऱ्या पोलीस निरीक्षकांना नव्याने सर्व परिस्थिती व कार्यप्रणाली समजून घ्यावी लागते. सातत्याने पोलीस अधिकारी बदलत असल्याने गुन्ह्यांच्या तपासावरदेखील त्याचा परिणाम होत असल्याचे चित्र आहे.

तळोदा शहरात शुक्रवारी १४ मे रोजी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भरदुपारी दोन ठिकाणी घरफोडी करत आठ लाख रुपयांचा ऐवज चोरून नेत चोरट्यांनी पोलिसांपुढे आव्हान निर्माण केले आहे. तळोदा शहरात एकदा चोरीचे सत्र सुरू झाले की, शहरात विविध भागात चार ते पाच महिने सातत्याने चोऱ्या होतात. हा गेल्या काही वर्षांचा अनुभव आहे. हे रोखण्यासाठी व चोरांना तत्काळ जेरबंद करण्यासाठी तळोदा पोलीस ठाण्याला पूर्णवेळ पोलीस निरीक्षक लाभणे गरजेचे आहे. या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लोकांच्या मनातील ही भीती दूर करून पोलीस प्रशासनाविषयी विश्वास निर्माण करण्यासाठी पोलिसांकडून प्रयत्न होणे गरजेचे झाले आहे.

दरम्यान, सातत्याने चार-सहा महिन्यात पोलीस अधिकारी बदलत असल्याने तळोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांनादेखील ऊत आला आहे. काही दिवसांपूर्वी शहादा रोडवर एका हॉटेलमध्ये देहविक्रीचा अवैध धंदा सुरू असल्याच्या संशयाने छापा टाकला होता. पोलिसांना त्या ठिकाणी तसे काही आढळून आले नसले तरी त्या हॉटेलमध्ये अनेकांना संशयास्पदरीत्या महिलांचा वावर वेळोवेळी दिसून आलेला होता. याशिवाय मार्च महिन्याच्या अखेरीस तळोदा शहरात सट्टा आकडे घेणाऱ्या दोन जणांना सट्ट्याच्या चिठ्ठ्या व रोख रकमेसह जिल्हा स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रमाणे तळोदा परिसरात गुटखा व दारूची अवैध विक्री तसेच आंतरराज्य तस्करीदेखील मागील वर्षभरापासून मोठ्या प्रमाणात होत असल्याचे सांगितले जाते. वर्षभरात काही महिन्यांच्या अवधीनंतर पोलीस अधिकारी बदलत असल्याने अवैध धंदेवाल्याचेदेखील चांगलेच फावते आहे.

ग्रामीण भागातदेखील गुन्ह्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असून, गेल्या वर्षभरात तळोदा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जवळपास चार ते पाच खुनाच्या घटना घडल्या आहेत. काही दिवसांपासून शहरासह ग्रामीण भागांत चोरट्याचा उपद्रवदेखील वाढला आहे. शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात सुरू असणारे अवैध धंदे व चोऱ्या रोखण्यासाठी तळोदा पोलीस ठाण्याला किमान दीड ते दोन वर्षे तरी एकच पोलीस निरीक्षक असणे गरजेचे आहे.

प्रशासनातदेखील अडचणी

गेल्या दोन वर्षांपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रशासनाकडून वेळोवेळी लॉकडाऊन लावण्यात येत असते. लॉकडाऊनच्या अंमलबजावणीची मोठी जबाबदारीही पोलीस प्रशासनावर असते. महसूल, आरोग्य, पोलीस प्रशासनातील समन्वय कोरोना आटोक्यात आणताना खूप मोठी भूमिका निभावत असल्याचा अनुभव आहे. गेल्या वर्षी मे महिन्यापासून चार ते सहा महिन्यांत पोलीस निरीक्षक बदलत असल्याने कोरोनाच्या आपत्कालीन काळात अन्य विभाग व पोलीस प्रशासनात समन्वय साधताना अडचणी निर्माण झाल्याचे दिसून आले आहे. कोरोनाच्या आपत्कालीन परिस्थितीतदेखील तळोदा पोलीस ठाण्यात वर्षभरात सातत्याने पोलीस निरीक्षकांच्या बदल्या का? हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तळोदा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत कारभार व प्रशासनावरदेखील सातत्याने पोलीस अधिकारी बदलत असल्याचा परिणाम होत असल्याचे सांगितले जाते. नवीन येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विश्वासू बनण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये छुपी स्पर्धादेखील दिसून आली आहे.