तळोदा-अक्कलकुवा रोडवर दुचाकी अपघातात तिघांचा मृत्यू

By भूषण.विजय.रामराजे | Published: May 15, 2023 04:51 PM2023-05-15T16:51:04+5:302023-05-15T16:51:13+5:30

धडकेत मोटारसायकलीवरील पंकज वळवी आणि राहुल वळवी हे दोघे भाऊ गंभीर जखमी झाले.

Three killed in two-wheeler accident on Taloda-Akkalkuwa road | तळोदा-अक्कलकुवा रोडवर दुचाकी अपघातात तिघांचा मृत्यू

तळोदा-अक्कलकुवा रोडवर दुचाकी अपघातात तिघांचा मृत्यू

googlenewsNext

नंदुरबार : तळोदा ते अक्कलकुवा दरम्यान बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर भरधाव वेगातील मोटारसायकलींच्या अपघातात तीन युवक ठार झाल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली होती. सोमावल फाट्याजवळ झालेल्या या अपघातप्रकरणी गुन्ह्याची नोंद आहे. भीषण अशा या अपघातात बादल रवींद्र ठाकरे (२२) रा. गव्हाणीपाडा ता. तळोदा, पंकज दिलवर वळवी (२८) व राहुल दिलवर वळवी (२६) दोघे रा. मोरंबा खालचापाडा ता. कुकरमुंडा जि. तापी (गुजरात) हे तिघे ठार झाले आहेत.शुक्रवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास गव्हाणीपाडा येथून बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावरून बादल रवींद्र पाडवी हा एमएच १५ एफएल ४६२४ या दुचाकीने गावातीलच अतुल पाडवी याच्यासोबत जात असताना सोमावल फाट्याजवळ समोरून येणाऱ्या जीजे ०५ एसएच २८९५ या मोटारसायकलीला धडक दिली.

धडकेत मोटारसायकलीवरील पंकज वळवी आणि राहुल वळवी हे दोघे भाऊ गंभीर जखमी झाले. रक्तस्त्राव अधिक झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान बादल याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघातात बादल याच्या मागे बसलेल्या अतुल पाडवी यालाही गंभीर जखमा झाल्या आहेत. दरम्यान याप्रकरणी योगेश अशोक ठाकरे यांनी तळोदा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून मयत बादल रवींद्र पाडवी (२२) याच्याविरोधात भरधाव वेगात मोटारसायकल चालवत अपघात घडवून स्वतसह समोरील दुचाकीवरील दोघांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे. तपास सहायक पोलिस निरीक्षक अमितकुमार बागुल करीत आहेत.

Web Title: Three killed in two-wheeler accident on Taloda-Akkalkuwa road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Accidentअपघात