Three killed, car smashed in Kondaibari Ghat of dhule surat express highway | भयंकर! कोंडाईबारी घाटात भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, कारचा चक्काचूर 

भयंकर! कोंडाईबारी घाटात भीषण अपघातात तिघांचा मृत्यू, कारचा चक्काचूर 

ठळक मुद्देधुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटात भीषण अपघात झाला असून या अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी असून दोघांवर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

नंदुरबार - धुळे सुरत महामार्गावर कोंडाईबारी घाटात भीषण अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रकने धडक दिल्यानंतर पुलावरून 35 फुट खोल नदीत कार कोसळल्यानेअपघात झाला. पोलीस आणि गावकऱ्यांच्या सहकार्याने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. कोंडाईबारी घाटात हा भीषण अपघात झाला आहे. 

धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावर कोंडाईबारी घाटात भीषण अपघात झाला असून या अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी असून दोघांवर नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. सुरतकडून धुळ्याकडे जाणाऱ्या स्विफ्ट गाडीला ओव्हरटेक करणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने कार पुलावरून तीस फूट खोल दरीत कोसळल्याने कारचा चक्काचूर झाला या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे कोंडाईबारी घाटातील या पुलावरून मागील महिन्यात लक्झरी बस कोसळून पाच जणांना आपला जीव गमवावा लागला होता. तरीही राष्ट्रीय महामार्ग प्रशासनाने या पुलाच्या कठड्याची दुरुस्तीकडे लक्ष दिले नसल्याचे समोर आले आहे.महामार्ग प्राधिकरणाच्या दुर्लक्षामुळे या ठिकाणी वारंवार अपघात होऊन निरपराध वाहनचालकांना आपला जीव गमवावा लागत आहे. अपघातात जखमी आणि मयत धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील आहे. विसरवाडी पोलीस आणि ग्रामस्थांनी अपघाताच्या ठिकाणी मदत कार्य करून जखमींना बाहेर काढले असून त्यांना अधिक उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. मृत्यूचा सापळा बनत चाललेल्या राष्ट्रीय महामार्ग वरील मुलांची सुरक्षितता ऑडिट होणे गरजेचे आहे.

मृतकांचे नावे

1)गोरख सोनू सरख वय 45 रा. महिर ता. साक्री


2) प्रफुल सुरेश वाघमोडे वय 35


3) मनीषा प्रफुल वाघमोडे वय 21 (दोन्ही रा. राजकोट गुजरात)

जखमी -1) निकिता गोरख सरख वय 15

Web Title: Three killed, car smashed in Kondaibari Ghat of dhule surat express highway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.