शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
PBKS vs DC : 'बापू'ची क्रांती; 'किलर' मिलरनंही काढला राग! पंजाबसमोर दिल्लीकरांचा 'भांगडा'
4
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
5
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
6
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
7
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
8
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
9
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
10
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
11
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
12
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
13
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
14
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
15
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
16
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
17
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
18
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
19
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
20
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
Daily Top 2Weekly Top 5

फोटोग्राफी कला जोपासणाऱ्या तीन पिढ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 12:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात १९३२ पासून फोटोग्राफी करणारे एकमेव कुटूंब सध्या नंदुरबार शहरात वास्तव्यास आहे़ शहरातील मंगळबाजारात ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात १९३२ पासून फोटोग्राफी करणारे एकमेव कुटूंब सध्या नंदुरबार शहरात वास्तव्यास आहे़ शहरातील मंगळबाजारात आद्य छायाचित्रकार रामभाऊ जगन पाटील यांनी जोपासलेला वारसा त्यांच्या एका पिढीने चालवला असून तिसरी पिढी या व्यवसायात नव्या तंत्रज्ञानासह कार्यरत आहे़
स्वातंत्र्यपूर्व काळात अर्थात १९३२ पासून फोटोग्राफी व्यवसायात असलेले कै़ रामभाऊ जगन पाटील हे मंगळ बाजारातील पाटील फोटो स्टुडिओ चालवीत असत़ त्यांनी सुमारे ६५ वर्ष फोटोग्राफी कलेची जोपासना करत हा व्यवसाय वाढवला़ जुन्या काळात त्यांनी शासकीय फोटोग्राफर म्हणूनही काम केल़ स्वातंत्र्यपूर्व काळात १९३२ पासून सूर्यप्रकाशावर आधारित फोटोग्राफी कॅमेºयाच्या सहाय्याने व्यवसायाला सुरुवात केली़ नंदुरबार सारख्या अतिदुर्गम भागात त्यांनी आपला छंद असलेला फोटोग्राफी व्यवसाय खडतर प्रवासातून सुरू केला़ फोटोग्राफी ही एक कला आहे ती कला जोपासत आपला छंद व्यवसाय म्हणून निवडला त्या माध्यमातून त्यांनी स्टुडिओ व्यतिरिक्त होणारे विविध समारंभ व शासकीय कार्यक्रमांना फोटोग्राफीच्या माध्यमातून हजेरी लावली़ त्यामुळे त्यांनी विविध ठिकाणी अनेक फोटो आपल्या कॅमेरात टिपले हाते़ यातून त्यांनी एक ऐतिहासिक ठेवा निर्माण करुन ठेवला आहे़
रामभाऊ पाटील यांचे नातू नितीन पाटील आजोबांच्या स्मृतीनिमित्त आदिवासी संस्कृती, निसर्ग, यात्रा, उत्सव यासह विविध विषयांवर फोटो प्रदर्शन भरवत त्यांच्या स्मृतींना दरवर्षी उजाळा देत आहेत़ सोबतच राज्यस्तरीय छायाचित्र स्पर्धा आणि सारंगखेडा ता़ शहादा येथे सुप्रसिद्ध अशा चेतक फेस्टीवलमध्ये छायाचित्र प्रदर्शन भरवण्याचा मानही त्यांनी मिळवला आहे़ या प्रदर्शनाचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याहस्ते करण्यात आले होते़ त्यांना विविध राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार व पारितोषिक देखील मिळाले आहेत.

कैलासवासी रामभाऊ पाटील यांनी त्यांच्या ६५ वर्षांच्या कारकिर्दीत मोरवड येथील संत गुलाम महाराज, संत पहेलवान बाबा, संत दगा महाराज, संत मोरारी बापू यांच्यासह थोर पुरुषांमधील स्वातंत्र्यवीर सावरकर, साने गुरुजी तसेच राजकीय नेत्यांमध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, अटल बिहारी वाजपेयी, बाळासाहेब ठाकरे, राजीव गांधी, माजी मुख्यमंत्री वसंत दादा पाटील, ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह दिग्गज अशा नेत्यांची छायाचित्रेही टिपली आहेत़ रामभाऊंच्या निधनानंतर त्यांचे पुत्र भरत पाटील आणि कै.सुनील पाटील यांनी तर त्यांच्यानंतर आजघडीस नातू नितीन पाटील हे फोटोग्राफी व्यवसायाचा वारसा पुढे चालवत आहेत़