शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

नगाव येथील चोरीप्रकरणी तिघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 12:27 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : तालुक्यातील नगाव तिसी येथील जिल्हा परिषद शाळेतून १८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता़ ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील नगाव तिसी येथील जिल्हा परिषद शाळेतून १८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता़ गुन्ह्याप्रकरणी एलसीबीच्या पथकाने तिघांना अटक केली आहेनगाव तिसी येथील जिल्हा परिषदेची शाळा बंद असल्याने चोरट्यांनी डिजीटल साहित्यासह तांदूळ चोरी करुन नेला होता़ मुख्याध्यापिका प्रमिलाबाई साहेबराव देसाई यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ दरम्यान चोरीच्या घटनेची माहिती घेत एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले यांनी तपास सुरु केला होता़ पॅरोलवर सुटलेल्या गुन्हेगारांवर नजर ठेवत त्यांनी तपास सुरु केला होता़ यात भालेर येथील रविंद्र कथ्थू, कृष्णा चव्हाण व विठ्ठल कोळी यांनी चोरी केल्याची खात्रीशीर माहिती त्यांना मिळाली होती़ यातून त्यांनी नियुक्त केलेल्या पथकाने भालेर येथे जावून संशयितांचा शोध सुरु केला होता़ यादरम्यान रविंद्र कथ्थू पवार हा पथकाच्या हाती आला होता़ त्याची चौकशी केली असता, आधी उडवाउडवीची उत्तरे दिली होती़ परंतू पथकाने पोलीस खाक्या दाखवताच त्याने कृष्णा रतीलाल चव्हाण (कोळी) व विठ्ठल रतिलाल कोळी यांची नावे सांगितली होती़ पथकाने दोघांना तिसी येथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना ताब्यात घेतले़ त्यांच्याकडून शाळेतून चोरलेला प्रोजेक्टर, सीपीयू आदी १४ हजार २१६ रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे़ ही कारवाई पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत , अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, यांच्या मार्गदर्शनात वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर नवले, पोलीस कॉन्स्टेबल रविंद्र पाडवी, सजन वाघ, पोलीस नाईक विशाल नागरे, दादाभाऊ मासूळ, बापू बागुल, जितेंद्र अहिरराव, यशोदीप ओगले यांच्या पथकाने केले़