वडाळी शिवारातील पंपातून हजार लिटर डिझेल लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 12:39 IST2020-12-24T12:39:06+5:302020-12-24T12:39:17+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  बंद डिझेलपंपच्या टाकीतून तब्बल ७९ हजार रुपये किंमतीचे डिझेल चोरून नेल्याची घटना सारंगखेडा शिवारात ...

Thousands of liters of diesel lamps from a pump in Wadali Shivara | वडाळी शिवारातील पंपातून हजार लिटर डिझेल लंपास

वडाळी शिवारातील पंपातून हजार लिटर डिझेल लंपास

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार :  बंद डिझेलपंपच्या टाकीतून तब्बल ७९ हजार रुपये किंमतीचे डिझेल चोरून नेल्याची घटना सारंगखेडा शिवारात घडली. याबाबत सारंगखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनुसार, वडाळी शिवारात  डिझेलपंप आहे. या भागात शेतशिवार असल्याने रात्रीच्या वेळी कुणीही नसते. ही संधी साधून चोरट्यांनी २० ते २१ डिसेंबर रोजी रात्री चोरट्यांनी तब्बल एक हजार लिटर डिझेल  चोरून नेले. त्याची किंमत ७९ हजार रुपये इतकी आहे.
२१रोजी सकाळी ही बाब उघड झाल्यानंतर मुनेशचंद्र बापू जगदेव यांनी याबाबत सारंगखेडा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास फौजदार भगवान कोळी करीत आहे. 

Web Title: Thousands of liters of diesel lamps from a pump in Wadali Shivara