शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
2
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
3
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
4
ज्येष्ठ साहित्यिक डॉ. जयप्रकाश घुमटकर यांचे निधन; ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
5
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
6
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
7
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
8
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
9
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
10
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
11
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
12
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
13
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
14
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
15
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
16
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
17
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
18
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
19
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
20
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
Daily Top 2Weekly Top 5

२७ हजार शेतकऱ्यांना ३८ गावांच्या आचारसंहितेचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 12:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील ३८ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे़ याचा परिणाम म्हणजे जिल्ह्यातील ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील ३८ गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता लागू करण्यात आली आहे़ याचा परिणाम म्हणजे जिल्ह्यातील २७ हजार शेतकरी कर्जमाफीपासून वंचित आहेत़ येत्या २९ मार्च रोजी आचारसंहिता संपुष्टात आल्यानंतर या शेतकऱ्यांसाठीचे पोर्टल सुरु होण्याची शक्यता आहे़महात्मा फुले कृषी कर्जमाफी योजनेंतर्गत जिल्ह्यातील शेतकºयांच्या कर्जमाफीची प्रक्रिया महिन्याभरापासून वेगात सुरु आहे़ २९ फेब्रुवारी रोजी यांतर्गत राज्यातील सर्व जिल्ह्यातील पात्र शेतकºयांच्या याद्या असलेले पोेर्टल सुरु होणार असल्याने प्रशासकीय विभाग, बँका यांनी शाखांमध्ये तयारी पूर्ण केली होती़ परंतू नंदुरबार राज्यातील सात जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने हे जिल्हे वगळून शासनाने इतर जिल्ह्याच्या याद्या प्रकाशित केल्या आहेत़ लगतच्या धुळे जिल्ह्यातही शेतकरी कर्जमुक्त योजनेंतर्गत पात्र ठरत असल्याचे कामकाज वेगात सुरु झाले आहे़ जिल्ह्यातील ३८ गावांमध्ये ही आचारसंहिता असल्याने संपूर्ण जिल्ह्यातील शेतकºयांना वेठीस धरण्याचे कारण, काय, असा प्रश्न शेतकºयांकडून विचारला जात आहे़दरम्यान जिल्हा बँकेने नंदुरबार जिल्ह्यातून पाठवलेल्या १३ हजार शेतकºयांच्या याद्या पूर्णपणे मंजूर करण्यात आल्याची माहिती असून शेतकºयांचे ९० कोटी रुपये माफ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे़ परंतू पोर्टलच सुरु झालेले नसल्याने ग्रामपंचायत आचारसंहिता पूर्ण झाल्यावर नंदुरबार जिल्ह्याचे कामकाज सुरु होणार असल्याचे सांगण्यात आले आहे़ याबाबत शासनाकडून अद्याप कोणतेही अधिकृत असे आदेश देण्यात आलेले नाहीत़ केवळ पोर्टल सुरु झालेले नसल्याने संबधित विभागाचे म्हणणे आहे़ जिल्हा बँकेसह राष्ट्रीयकृत बँकांनीही याद्यांची कामे पूर्ण केल्याची माहिती असून शेतकºयांचे आधार अपडेशनही पूर्ण करण्यात आले आहे़जानेवारी महिन्यापर्यंत जिल्ह्यातील ३० हजार २९१ शेतकºयांच्या आधार अपडेशनचे काम पूर्ण करण्यात आले होते़ यातील २६ हजार शेतकºयांची नावे शासनाने कर्जमाफीसाठी अंतिम करत कामकाज सुरु केले होते़ २९ रोजी ही नावे याद्यांद्वारे पोर्टलवरुन प्रकाशित होणार होती़ परंतू ग्रामपंचायत निवडणूक आचारसंहिता त्याच्या आड आली आहे़ यात जिल्हा बँकेचे एकूण १३ हजार ८९३ तर ११ राष्ट्रीयकृत बँकांचे १२ हजार १०७ शेतकरी आहेत़ धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ८९ कोटी रुपये कर्ज माफ होणार असल्याने बँकेने सर्व कामकाज पूर्ण करुन ठेवले होते़ तर दुसरीकडे राष्ट्रीयकृत बँकांची कर्जमाफीची प्रक्रिया ही केंद्रीय पद्धतीने असल्याने त्यांच्याकडून जिल्ह्यातील रकमेचा अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही़४कर्जमाफीसाठी पात्र असलेल्या शेतकºयांच्या याद्या पोर्टलवरुन प्रकाशित होणार असल्याने जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बॅकांची तयारी पूर्ण झाली होती़ नंदुरबार तालुक्यातील नांदरखेडा आणि खोंडामळी येथील शेतकºयांसाठी करण्यात आलेल्या कामकाजाची येथे पुनरावृत्ती होणार होती़ यासाठी शेतकºयांचे अंगठ्याचे ठसे घेण्यात येणार होते़ यासाठी बहुतांश शाखांमध्ये थंब मशिन आणून तयारी झाली होती़ परंतू आचारसंहितेमुळे खोडा लागल्याने हे कामकाज लांबणीवर पडले असल्याची माहिती आहे़४येत्या २९ मार्च रोजी मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आचारंसहिता आटोपणार असली तरी महिनाभर कर्जमाफीची प्रक्रिया लांबणीवर पडणार आहे़ प्रत्यक्षात एप्रिलमध्ये कर्जमाफी होणार असल्याचे सांगण्यात येऊन खरीपासाठी पीक कर्ज घेऊ इच्छिणाºया शेतकºयांना याचा कोणताही फटका बसणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे़ हा निवडणूक कार्यक्रम आटोपल्यानंतर पुढील कोणताही कार्यक्रम नसल्याने कर्जमाफी प्रक्रियेला वेग देण्याचे संकेत आहेत़