शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदान आटोपताच महागाईचा भडका, गॅस सिलेंडरच्या किमतीत थेट ९९३ रुपयांची वाढ, नवे दर आजपासून लागू
2
आजचे राशीभविष्य, ०१ मे २०२६: प्रकृतीची काळजी घ्या, आजारपणावर खर्च होण्याची शक्यता!
3
राज्यात आजपासून डिजिटल जनगणना; प्रथमच ‘स्व-गणना’चा पर्याय उपलब्ध, स्व-गणना कशी कराल?
4
नाट्यमय घडामोडींनंतर विधान परिषदेच्या १० जागा बिनविरोध; महायुतीला ९ तर मविआला १ जागा
5
रात्रही ‘ताप’दायक, महिनाभर वाढता उकाडा; चंद्रपूरात सर्वाधिक उष्ण तापमानाची नोंद
6
महापालिकेची उदासीनता, ना मदत, ना दिलासा! महापाैर, उपमहापाैर कुणीही घटनास्थळी जाऊ शकले नाहीत
7
७० टनाची क्रेन उचलण्यासाठी पालिकेची १३ टनाची क्रेन; वाहतूक कोलमडली, नेमकी चूक कुणाची?
8
मूठभरांमुळे मराठा समाजाला आरक्षण नाकारणे अयोग्य; राज्य सरकारचा हायकोर्टात युक्तिवाद
9
चिंताजनक! सरकारी तिजोरी खोला अन् रुपयाच्या घसरणीचे दुष्परिणाम रोखा, अन्यथा...
10
"महाराष्ट्राचे पाऊल निरंतर प्रगतीच्या दिशेनेच..."; मुख्यमंत्र्यांनी दाखवलं आश्वासक राज्याचं चित्र
11
अत्यंत धोकादायक! पाकमध्ये फुग्यात गॅस भरून होतोय स्वयंपाक; हा प्रकार म्हणजे चालता-फिरता बॉम्ब
12
१० पायऱ्या चढायला ४० वर्षे लागतात, तेव्हा...; विधान परिषदेसाठी भाजपानं 'यांनाच' संधी का दिली?
13
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
14
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
15
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
16
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
17
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
18
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
19
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
20
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
Daily Top 2Weekly Top 5

यात्रोत्सवात १० हजार बैलांची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 12:55 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : शहरालगत सोरापाडा येथील श्री महाकाली मातेच्या यात्रोत्सवास शनिवारपासून सुरुवात झाली आहे़ यापार्श्वभूमीवर येथील सुप्रसिद्ध ...

लोकमत न्यूज नेटवर्कअक्कलकुवा : शहरालगत सोरापाडा येथील श्री महाकाली मातेच्या यात्रोत्सवास शनिवारपासून सुरुवात झाली आहे़ यापार्श्वभूमीवर येथील सुप्रसिद्ध अशा बैल बाजाराला सुरुवात झाली असून रविवारी दीडशे बैलांची विक्री होऊन ४० लाख रुपयांची उलाढाल झाली़सोरापाडा येथील श्री कालिका मातेच्या यात्रा उत्सव आजपासून सुरू झाला आहे़ या यात्रेतील प्रसिद्ध बैल बाजारात महाराष्ट्रासह गुजरात , मध्य प्रदेश या राज्यांतून गावठी ,खिलारी आदि जातींचे बैल या विक्रीसाठी आणले गेले आहेत़ यंदा शनिवार सायंकाळपर्यंत दहा हजार बैलांची आवक झाली आहे़ रविवारी सकाळी बाजार सुरु झाल्यानंतर दीडशे बैलांची विक्री झाली़ यातून ४० लाखांची उलाढा झाली आहे़ पहिल्या दिवशी काही प्रतिसाद कमी असला तरी येत्या चार दिवसात बाहेरगावाहून बैल खरेदी करण्यासाठी व्यापारी हजेरी लावणार असल्याने उलाढाल वाढणार आहे़ दरम्यान यंदा बैलांची आवक कमी झाल्याचे दिसून आले आहे़ दरवर्षी किमान ३० हजारपेक्षा अधिक बैल याठिकाणी विक्री आणले जात होते़ यंदा पहिल्या दिवशी बैलांची आवक कमी झाल्याने बाजारातील उलाढालीवर परिणाम झाला आहे़ यात्रोत्सवात भरवल्या जाणाऱ्या बैलबाजारात तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल होते़ उलाढालीमुळे बाजार समितीला महसूल मिळत असल्याने त्यांच्याकडून येथे व्यवस्था करण्यात येते़ येत्या दोन दिवसात आवक वाढण्याचा अंदाज असून मराठवड्यातील बैल खरेदीदार येणार असल्याने उलाढाल वाढणार आहे़ बाजारासाठी सचिव जितेंद्र माळी व सहसचिव दिपक हिरे यांच्यासह कर्मचारी परीश्रम घेत आहेत़

 

शनिवारी राजबर्डी ता़ धडगाव येथून रविंद्र पावरा यांच्या मालकीची बैलजोडी १ लाख रुपयांना व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्यात आली़ तर रविवारी उमराणे ता़ धडगाव येथीलच येथील ठुमल्या नाहºया पावरा यांच्या मालकीची गावठी जातीचा बैलांची जोडी साक्री तालुक्यातील शेतकºयाने ४९ हजार रुपयात खरेदी केली़ खरेदीदार सातपुड्याच्या दुर्गम भागातील गावठी बैलांना सर्वाधिक प्राधान्य देतात़

बैल बाजाराच्या पार्श्वभूमीवर इतर पूरक रोजगारांचीही निर्मिती झाली आहे़ चारा विक्रेते, दोरखंड, बैलांचा साज विक्रेतेही याठिकाणी हजर झाले आहेत़ २४ तास सुरु राहणाऱ्या या बैल बाजारात आलेल्या प्रत्येक खरेदीदार आणि शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करुन जागा देण्यात आली आहे़