यात्रोत्सवात १० हजार बैलांची आवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2020 12:55 IST2020-02-10T12:55:02+5:302020-02-10T12:55:11+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अक्कलकुवा : शहरालगत सोरापाडा येथील श्री महाकाली मातेच्या यात्रोत्सवास शनिवारपासून सुरुवात झाली आहे़ यापार्श्वभूमीवर येथील सुप्रसिद्ध ...

Thousands of bulls arrive in the yatra | यात्रोत्सवात १० हजार बैलांची आवक

यात्रोत्सवात १० हजार बैलांची आवक

लोकमत न्यूज नेटवर्क
अक्कलकुवा : शहरालगत सोरापाडा येथील श्री महाकाली मातेच्या यात्रोत्सवास शनिवारपासून सुरुवात झाली आहे़ यापार्श्वभूमीवर येथील सुप्रसिद्ध अशा बैल बाजाराला सुरुवात झाली असून रविवारी दीडशे बैलांची विक्री होऊन ४० लाख रुपयांची उलाढाल झाली़
सोरापाडा येथील श्री कालिका मातेच्या यात्रा उत्सव आजपासून सुरू झाला आहे़ या यात्रेतील प्रसिद्ध बैल बाजारात महाराष्ट्रासह गुजरात , मध्य प्रदेश या राज्यांतून गावठी ,खिलारी आदि जातींचे बैल या विक्रीसाठी आणले गेले आहेत़ यंदा शनिवार सायंकाळपर्यंत दहा हजार बैलांची आवक झाली आहे़ रविवारी सकाळी बाजार सुरु झाल्यानंतर दीडशे बैलांची विक्री झाली़ यातून ४० लाखांची उलाढा झाली आहे़ पहिल्या दिवशी काही प्रतिसाद कमी असला तरी येत्या चार दिवसात बाहेरगावाहून बैल खरेदी करण्यासाठी व्यापारी हजेरी लावणार असल्याने उलाढाल वाढणार आहे़ दरम्यान यंदा बैलांची आवक कमी झाल्याचे दिसून आले आहे़ दरवर्षी किमान ३० हजारपेक्षा अधिक बैल याठिकाणी विक्री आणले जात होते़ यंदा पहिल्या दिवशी बैलांची आवक कमी झाल्याने बाजारातील उलाढालीवर परिणाम झाला आहे़ यात्रोत्सवात भरवल्या जाणाऱ्या बैलबाजारात तीन कोटी रुपयांपेक्षा अधिक उलाढाल होते़ उलाढालीमुळे बाजार समितीला महसूल मिळत असल्याने त्यांच्याकडून येथे व्यवस्था करण्यात येते़ येत्या दोन दिवसात आवक वाढण्याचा अंदाज असून मराठवड्यातील बैल खरेदीदार येणार असल्याने उलाढाल वाढणार आहे़ बाजारासाठी सचिव जितेंद्र माळी व सहसचिव दिपक हिरे यांच्यासह कर्मचारी परीश्रम घेत आहेत़

 


शनिवारी राजबर्डी ता़ धडगाव येथून रविंद्र पावरा यांच्या मालकीची बैलजोडी १ लाख रुपयांना व्यापाऱ्यांकडून खरेदी करण्यात आली़ तर रविवारी उमराणे ता़ धडगाव येथीलच येथील ठुमल्या नाहºया पावरा यांच्या मालकीची गावठी जातीचा बैलांची जोडी साक्री तालुक्यातील शेतकºयाने ४९ हजार रुपयात खरेदी केली़ खरेदीदार सातपुड्याच्या दुर्गम भागातील गावठी बैलांना सर्वाधिक प्राधान्य देतात़


बैल बाजाराच्या पार्श्वभूमीवर इतर पूरक रोजगारांचीही निर्मिती झाली आहे़ चारा विक्रेते, दोरखंड, बैलांचा साज विक्रेतेही याठिकाणी हजर झाले आहेत़ २४ तास सुरु राहणाऱ्या या बैल बाजारात आलेल्या प्रत्येक खरेदीदार आणि शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र व्यवस्था करुन जागा देण्यात आली आहे़

Web Title: Thousands of bulls arrive in the yatra