चोरट्यांचा सुका मेवा व खाद्य तेलावर डल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2021 04:23 IST2021-05-29T04:23:35+5:302021-05-29T04:23:35+5:30

सकाळी खेडकर यांची मुलं राजा व दीपक खेडकर हे दुकानावर आले असता आठ वाजेच्या सुमारास त्यांना दुकानातून चोरी ...

Thieves rely on dried fruits and edible oil | चोरट्यांचा सुका मेवा व खाद्य तेलावर डल्ला

चोरट्यांचा सुका मेवा व खाद्य तेलावर डल्ला

सकाळी खेडकर यांची मुलं राजा व दीपक खेडकर हे दुकानावर आले असता आठ वाजेच्या सुमारास त्यांना दुकानातून चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर शहादा पोलीस स्टेशनला याबाबत त्यांनी माहिती दिलेली आहे.

गेल्या महिन्यात दहा दुकानातून चोरी............

शहादा शहरातील मुख्य भाजीपाला मार्केटमधील चोरीच्या घटना हे नित्याचेच झालेले आहे. गेल्या काही महिन्यापासून शहरातील नवीन भाजीपाला मार्केट तात्पुरत्या स्वरुपात शहराच्या बाहेर हलविण्यात आल्याने भाजीपाला मार्केटमधील पहाटेची रात्रभर सुरू असलेली वर्दळ थंडावलेली आहे. या संधीचा फायदा चोरट्यांनी घेत या भाजीपाला मार्केटमध्ये चोरीचे सत्र सुरू ठेवले आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भाजीपाला मार्केट मधील दहा दुकानातून विविध चोरीच्या घटना घडल्या आहे. पोलिसांकडे याबाबत देखील तक्रार करण्यात आलेली आहे परंतु अद्याप या घटनेतील संशयितांना अटक करण्यात आली नाही.

नगरपालिका प्रशासनाकडून या मार्केटची दुरुस्ती करण्यात आलेली आहे. भाजीपाला मार्केटमध्ये सुमारे ७० पेक्षा अधिक गाळे असून या गाळ्यापोटी पालिकेला वर्षात लाखो रुपये भाडे प्राप्त होत असून पालिकेने या भाजीपाला मार्केटला सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करावी अशी मागणी व्यापारी वर्गाकडून होत आहे. याशिवाय या भागात रात्रीची गस्त वाढविण्याचीही मागणी होत आहे.

Web Title: Thieves rely on dried fruits and edible oil