शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Vidhan Sabha 2019: आदिवासी आरक्षणाला धक्का नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 12:15 IST

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा :  आदिवासींना राज्यघटनेने आरक्षण दिले आह़े त्यांचे आरक्षण काढण्याचा प्रश्नच नाही़ उलट सर्वात जास्त आदिवासी ...

लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा :  आदिवासींना राज्यघटनेने आरक्षण दिले आह़े त्यांचे आरक्षण काढण्याचा प्रश्नच नाही़ उलट सर्वात जास्त आदिवासी आमदार-खासदार भाजपाने निवडून आणले आहेत़ असा दावा करुन भाजपच्या राज्यातच ख:या अर्थाने सर्वघटकांना न्याय मिळाल्याचे प्रतिपादन भाजपाचे राष्टीय कार्याध्यक्ष ज़ेपी़नड्डा यांनी केल़े         शहादा-तळोदा मतदार संघाचे उमेदवार राजेश पाडवी यांच्या प्रचारार्थ सोमवारी तळोद्यातील आनंद चौकात विजय संकल्प सभा घेण्यात आली़ त्यावेळी ते बोलत होत़े प्रसंगी राज्याचे प्रभारी व्ही़सतीश, गुजरातचे आमदार ज़ेपी़झडपीया, माजी आमदार डॉ़ नरेंद्र पाडवी, जिल्हाध्यक्ष विजय चौधरी, डॉ़ शशिकांत वाणी नगराध्यक्ष अजय परदेशी, उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल, माजी जिल्हा परिषद सदस्य अभिजीत पाटील, रुपसिंग पाडवी, योगेश चौधरी, राजेंद्रकुमार गावीत, राजेंद्र राजपूत, यशवंत पाडवी, जितेंद्र दुबे, प्रकाश कुळकर्णी, जितेंद्र पाडवी, आनंद सोनार, विश्वनाथ कलाल उपस्थित होत़े पुढे बोलताना नड्डा म्हणाले की, काँग्रेसने राज्यात अनेक वर्षे राज्य केलेले असताना पूर्ण पाच वर्षे स्थिती मुख्यमंत्री दिला नाही़ आलटून पालटून नेतृत्त्व दिल़े त्यामुळे भ्रष्टाचारही बोकाळला होता़ मात्र देवेंद्र फडणवीस सरकारने पूर्ण पाच वर्षे स्थिर सरकार चालवून राज्याचा विकास घडवून आणला आह़े केंद्रातील मोदी सरकारने काश्मिरातील 370 कलम रद्द करुन ऐतिहासिक निर्णय घेतला आह़े यामुळे जम्मू काश्मिरातील नागरिकांना देशाच्या विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले आह़े तेथे ख:या अर्थाने देशाचे संविधान लागू झाले आह़े मात्र विरोधक सरकारच्या विरोधात अपप्रचार करीत आहेत़  काँग्रेसने नेहमीच मतांचे राजकारण करुन दोन धर्मामध्ये भांडणे लावण्याचा उपदव्याप करीत असल्याचा आरोप त्यांनी केला़  370 कलम रद्द झाल्याने तेथील आदिवासींना आरक्षणाचा लाभ मिळणार आह़े असे सांगून केंद्र सरकारने गेल्या पाच वर्षात देशा बरोबरच राज्यातही अनेक विकासाच्या योजना राबविल्या आहेत़ शेतकरी सन्मान योजनेत कोटय़ावधी शेतक:यांना थेट लाभ मिळाला़ याशिवाय पेन्शन योजना लागू झाली़ पिकांना देखील हमीभाव दिला़ देशातील 10 कोटी 60 लाख लोकांना आयुष्यमान भारत योजनेचा लाभ मिळाला असे असताना काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस जनतेच्या डोळ्यात धूळफेक करुन सरकारला बदनाम करत आह़े विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्त्वातील महायुतीच्या सरकारला भक्कम साथ द्या असे आवाहन त्यांनी केल़े यावेळी उमेदवार राजेश पाडवी यांनी आपल्या कामांचा लेखाजोखा मांडून मतदारसंघाच्या विकासाकरीता काय, कामे करणार याबाबतची माहिती सांगून सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका मांडली़ प्रास्ताविक पक्षाचे जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांनी केल़े सूत्रसंचालन भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉ़ शशीकांत वाणी, प्रा़ अविनाश मराठे यांनी केल़े