शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
3
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
4
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
5
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
6
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
7
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
8
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
9
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
10
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
11
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
12
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
13
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
14
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
15
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
16
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
17
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
18
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
19
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
20
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
Daily Top 2Weekly Top 5

‘बीडीओ’ हे पद मोठं भारी पण़़ चारचाकीची करावी लागते उसनवारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2020 13:02 IST

गुलाबसिंग गिरासे । लोकमत न्यूज नेटवर्क बोरद : नंदुरबार जल्ह्यातील सर्व सहा पंचायत समितीचा कारभार पाहून तालुका प्रशासन सुरळीत ...

गुलाबसिंग गिरासे ।लोकमत न्यूज नेटवर्कबोरद : नंदुरबार जल्ह्यातील सर्व सहा पंचायत समितीचा कारभार पाहून तालुका प्रशासन सुरळीत ठेवणाऱ्या गटविकास अधिकाऱ्यांना चारचाकी वाहनांअभावी कष्टाचे दिवस काढावे लागत आहेत़ शासकीय वाहनांचे हक्कदार असून जिल्ह्यातील सर्व सहा गटविकास अधिकाºयांना चारचाकी वाहनाची सोय नसल्याने त्यांना खाजगी किंवा पदाधिकाºयांच्या वाहनात तालुक्यात दौरे करावे लागत असल्याचे प्रकार सुरु आहेत़जिल्हा परिषदेच्या अखत्यारित जिल्ह्यातील सहा पंचायत समितीत नियुक्त गटविकास अधिकाºयांना नवीन वाहन देण्याचा प्रस्ताव दोन वर्षांपूर्वी मंजूर करण्यात आला होता़ पूर्वीचे अधिकारी वापरत असलेल्या वाहनांना १० वर्षे पूर्ण होऊन त्यांचा ‘घसारा’ झाला होता़ ही वाहने दोन लाख ४० हजार किलोमीटरपेक्षा अधिक फिरल्याचे समोर आल्यानंतर जिल्हा परिषदेने गटविकास अधिकारी वापरत असलेली वाहने थांबवली होती़ यातून मग नंदुरबार, तळोदा, शहादा, धडगाव, अक्कलकुवा आणि नवापुर गटविकास अधिकाºयांची परवड सुरु झाली आहे़ वाहन नसल्याने स्वत:चे किंवा भाडोत्री अथवा पदाधिकाºयांचे वाहन घेत अधिकारी वेळ मारुन नेत असल्याचे सध्या सुरु आहे़ दरम्यान या अधिकाºयांसाठी नवीन वाहन घेण्यासाठी शासनाच्या ग्रामविकास विभागाने प्रत्येकी सहा लाख रुपये मंजूर केल्याची माहिती आहे़ परंतू सहा लाखात कोणतेच नवीन वाहन भेटत नसल्याची माहिती आहे़ यातून मग वर्षभरापासून अधिकाºयांची परवड सुरु आहे़जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी वाहन खरेदीसाठी रक्कमेत वाढ करुन देण्याचा प्रस्ताव शासनाला दिला आहे़ परंतू तिकडून ‘रिप्लाय’ आला नसल्याने गटविकास अधिकाºयांना वाहनाची ‘उसनवारी’ करावी लागत आहे़ जिल्ह्यातील दोन तहसीलदारही गेल्या दोन वर्षांपासून याच उसनवारीचे बळी ठरत असल्याचेही चित्र दिसून आले आहे़