जिल्ह्यात दहा जण कोरोना मुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 12:20 IST2020-06-29T12:19:58+5:302020-06-29T12:20:07+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार/नंदुरबार : जिल्ह्यातील १० जण कोरोनामुक्त झाले आहेत़ यात सर्वाधिक सहा जण तळोदा येथील आहेत़ तर ...

Ten corona-free in the district | जिल्ह्यात दहा जण कोरोना मुक्त

जिल्ह्यात दहा जण कोरोना मुक्त

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार/नंदुरबार : जिल्ह्यातील १० जण कोरोनामुक्त झाले आहेत़ यात सर्वाधिक सहा जण तळोदा येथील आहेत़ तर नंदुरबार शहर, मंदाणे व लोणखेडा ता़ शहादा आणि मोलगी ता़ अक्कजकुवा येथील प्रत्येकी एक जण कोरोनामुक्त झाला आहे़
मुंबई येथून परतलेल्या कोरोनाची लक्षणे असणाऱ्या वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्यानंतर कुटुंबीय व अंत्ययात्रेत सहभागी झालेल्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यात मयत महिलेच्या मुलाचा अहवाल सर्वप्रथम पॉझिटिव्ह आला होता़ दरम्यान त्याच्या संपर्कातील सहा जणांनाही कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्या संपर्क साखळीत १३ जणांना कोरोनाची लागण झाली होती़यातील तब्बल सहा जणांनी कोरोनाशी लढा देत त्यावर मात केली आहे. यात मोठा माळीवाडा भागातील चार, काकाशेठ गल्ली एक तर शिवराम नगरातील एक अशा सहा जणांचा समावेश आहे़ शनिवारी महिलेच्या मुलाला डिस्चार्ज मिळाल्यानंतर उर्वरित बारा जणांपैकी सहा जणांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला. कोरोना पॉझिटीव्ह असलेल्या सहा जणांनी कोरोनावर मात केल्याने ते शहरवासीयांसाठी दिलासादायक वृत्त ठरले आहे. असे असले तरी १४ दिवस त्यांना क्वारंटाईन राहण्याच्या सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. दरम्यान, २५ जून रोजी तळोदा येथील मीरा कॉलनीतील एका दाम्पत्यालाही कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यामुळे तळोद्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या १५ वर गेली होती. आता त्यातील सात जण कोरोणामुक्त झाले असून आठ जणांवर उपचार सुरू आहेत.
दरम्यान नंदुरबार शहरातील मण्यार मोहल्ला येथील १, मंदाणे व लोणखेडा ता़ शहादा येथील प्रत्येकी एक आणि मोलगी येथील एक अशा चौघांनाही रविवारी घरी सोडण्यात आले़ सर्व १० रुग्णांना आरोग्य विभागाने सन्मानपूर्वक शुभेच्छा देत घराकडे रवाना केले़

Web Title: Ten corona-free in the district