शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
2
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
3
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
4
"अखिलेश माझे मित्र, कधीकधी...!'; लोकसभेत नेमकं काय म्हणाले मोदी? अखिलेश यादव यांनी हातच जोडले!
5
"मी ब्लँक चेक देतो, फोटोही छापायला तयार..."; महिला आरक्षणावर PM मोदींची विरोधकांना कोणती ऑफर?
6
अक्षय तृतीया 2026: सोन्याचा भाव 1.62 लाखांवर जाणार? हवे तर सोने आजच्या दराने लॉक करू शकता...
7
Vastu Tips: घरात पाऊल ठेवताच अस्वस्थ वाटतं? नकारात्मक ऊर्जा ओळखण्याचे संकेत आणि उपाय जाणून घ्या!
8
"हे सर्व पूर्णपणे खोटं, ते फक्त..."; TCS धर्मांतर प्रकरणावर शाहरुखच्या पत्नीची भलतीच थेअरी
9
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: "हा देशाच्या भविष्याचा विषय..."; उद्धव ठाकरेंचं मतदार संघ पुनर्रचनेवर भाष्य
11
लग्नानंतरही प्रियकराचा नाद सुटेना; संतापलेल्या वडिलांनी लेकीला संपवलं, 'असा' उघड झाला गुन्हा
12
IPL 2026: 'इडली-डोसा' गाण्यावरून रणांगण! मुद्दाम वाजविले..., CSK कडून RCB विरोधात BCCI कडे अधिकृत तक्रार
13
IPL 2026: एकही टी-२० सामना खेळला नाही, तरीही 'हा' खेळाडू घेऊ शकतो मुंबई इंडियन्समध्ये रोहितची जागा!
14
IPL 2026: 'मुंबई इंडियन्स'च्या ताफ्यात आला नवा खेळाडू; कोण आहे 'मिस्टर हँडसम'?
15
"अशा गोष्टी घडतच असतात..." छळ सहन करणाऱ्या तरुणीला TCSच्या महिला अधिकाऱ्यांनीच झापलं!
16
IPL 2026: आयपीएलमध्ये भारतीय सलामीवीर म्हणून सर्वाधिक षटकार; विराट- केएल राहुलमध्ये टक्कर!
17
अमेरिकेच्या नाकेबंदीला इराणच्या वाकुल्या; इराणी सुपरटँकर सुरक्षा भेदत होर्मुझ मार्गे पोहोचले आखातात
18
Chaitra Amavasya 2026: अमावस्येचा काळ असतो अतिसंवेदनशील; अंघोळीपूर्वी आठवणीने करा 'हा' ज्योतिषीय उपाय
19
"बाळ हवं तर तुझ्या बायकोला माझ्याकडे पाठव..."; धर्मांतरासाठी दबाव आणणारी गँग 'असा' करायचा छळ
20
नांदेड हादरले! डबक्यात बुडून ४ शाळकरी मुलांचा मृत्यू; शाळा सुटल्यानंतर पोहण्याचा मोह जिवावर बेतला
Daily Top 2Weekly Top 5

मुलगी मेली या विचारात असलेल्या आईच्या डोळ्यात आले आनंदाश्रू, कलमाडी येथील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:31 IST

सविस्तर वृत्त असे की, शहादा तालुक्यातील कलमाडीतर्फे बोरद येथील रहिवासी सुभाष पुंजू भिल हे आपल्या परिवारासोबत २०१९ मध्ये पोटाची ...

सविस्तर वृत्त असे की, शहादा तालुक्यातील कलमाडीतर्फे बोरद येथील रहिवासी सुभाष पुंजू भिल हे आपल्या परिवारासोबत २०१९ मध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी सौराष्ट्र (गुजरात) येथे मजुरीसाठी गेले असता तेथून मुलगी सुनिता सुभाष भिल ही हरवून गेल्याची धक्कादायक घटना घडली होती. आई, वडील, भाऊ यांनी सुनिता हिचा परिसरात शोध घेतला परंतु ती मिळाली नाही. दरम्यान, आई, वडील व भाऊ यांनी आपल्या मुलीला मृत समजून दुःख सहन करीत स्वगृही कलमाडी त.बो. येथे येऊन आपल्या मुलीचे उत्तरकार्यदेखील केले होते.

अन् त्यांना मिळाली मुलगी

सुनिता भिल ही गुजरात राज्यातील मंगल मंदिर मानव सेवा परिवार बगोदरा, ता.बावला, जि.अहमदाबाद येथील सदस्यांना ३१ मे २०१९ रोजी वेडसर अवस्थेत मिळाली होती. सुनिता भिल हिला योग्य ते उपचार केले असता दोन वर्षाच्या कालावधीत सुनिताला आपले नाव व गाव लक्षात आले व तिने संबंधित मंगल मंदिर मानव सेवा संस्थेच्या सदस्यांना सांगितले असता त्यांनी तात्काळ कलमाडी त.बो. गावाचा पत्ता काढून संबंधितांनी प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राला घटनेची माहिती दिली. आई्वडील व भावाला सुनिता ही जिवंत असल्याची माहिती मिळाली असता त्यांना आनंद झाला.

संस्थेने स्वखर्चाने पोहचविले घरी

मंगल मंदिर मानव सेवा परिवार बगोदरा (गुजरात) येथील सदस्यांनी संस्थेच्या वाहनाने सुनिताला २८ जुलै २०२१ रोजी तिची आई गीताबाई व भाऊ सुनील सुभाष भिल यांच्याकडे कलमाडी त.बो., ता.शहादा येथील घरी विनामूल्य आणून सोडले. त्याबद्दल शहादा पोलीस स्टेशन व कलमाडी ग्रामस्थांतर्फे मंगल मंदिर मानव सेवा परिवार संस्थेचे आभार व्यक्त करण्यात आले.

महिला हेल्पलाईन नंबरवरून मंगल मंदिर मानव सेवा परिवार येथे भ्रमणध्वनीद्वारे एक वेडसर अवस्थेत मुलगी असल्याची माहिती मिळाली असता आमच्या संस्थेत सुनिता नामक मुलीला आणून तिच्यावर उपचार केले. तिला गावाचे नाव लक्षात आल्यावर मी व माझा मुलगा अवध लाठीया सोबत जाऊन सुनिताला तिच्या घरी सुखरूप पोहचविले.

-दिनेश लाठीया, मंगल मंदिर मानव सेवा परिवार बगोदरा (गुजरात)