शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
3
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
5
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
6
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
7
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
8
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
9
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
10
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
11
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
12
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
13
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
14
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
15
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
16
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
17
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
18
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
19
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
20
बंगालचा निकाल काय लागणार? एक्झिट पोलवर दादाची 'गुगली'! हसत हसत म्हणाला, 'याची भविष्यवाणी तर..." 
Daily Top 2Weekly Top 5

संस्थाचालकांकडून शिक्षकांना मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 12:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : शैक्षणिक संस्था म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असा समज काही संस्थाचालकांनी करुन घेतल्याने शिक्षकांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शैक्षणिक संस्था म्हणजे सोन्याचे अंडे देणारी कोंबडी असा समज काही संस्थाचालकांनी करुन घेतल्याने शिक्षकांचा मोठ्या प्रमाणावर मानसिक व आर्थिक छळ होत असल्याच्या तक्रारी सुरु झाल्या आहेत़ याच प्रकारातून एका शाळेत संस्थाचालकांनी काहींना हाताशी धरुन शिक्षकांना विद्यार्थ्यांदेखत मारहाण केल्याची चर्चा सध्या सुरु झाली असून त्यामुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे़याबाबतचे वृत्त असे की, जिल्ह्यातील एका शैक्षणिक संस्थेत शाळा सुरू असतांना अचानक तीन ते चार जण शाळेत आले. आणि शिक्षकांवर विविध आरोप करीत त्यांना मारहाण केली. हा सर्व प्रकार विद्यार्थी डोळ्यासमोर पहात होते.शाळेत एकुण नऊ शिक्षक त्यावेळी उपस्थित होते. त्यापैकी चार शिक्षकांना संबधीतांनी बेदम मारहाण केली. यावेळी विद्यार्थी व विद्यार्थीनी शिक्षक तसे नाहीत असे सांगत होते. परंतु त्याची पर्वा न करता त्यांनी शिक्षकांना मारहाण सुरूच ठेवली. या घटनेत दोन शिक्षक गंभीर जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. ही बाब हळूहळू विविध शाळांमध्ये व शैक्षणिक क्षेत्रातील वर्तूळात पसरताच या घटनेची एकच चर्चा सुरू झाली आहे.दरम्यान, हा वाद रात्री पोलिसांपर्यंत पोहचला होता. त्या ठिकाणी पोलिसांनी सर्वांची कानउघाडणी केली. मात्र संबधित व्यक्ती व संस्था चालकांनी या संदर्भात शिक्षकांशी समझोता करण्याचा प्रयत्न केल्याने शिक्षकांनी तक्रार मागे घेतली व प्रकरण सामोपचाराने मिटले. परंतु त्याची धगधग मात्र शैक्षणिक वर्तूळात सुरूच आहे.