शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

तळोद्याच्या डॉक्टरची मुंबईला सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 13:19 IST

वसंत मराठे । लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : व्यवसायावर निष्ठा आणि रूग्णांच्या सेवेस प्राधान्य देवून तळोद्यातील तरूण डॉक्टर गेल्या ...

वसंत मराठे ।लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : व्यवसायावर निष्ठा आणि रूग्णांच्या सेवेस प्राधान्य देवून तळोद्यातील तरूण डॉक्टर गेल्या दीड महिन्यांपासून मुंबई येथील जे.जे. रूग्णालयात कोरोनाच्या रूग्णांवर अविरत उपचार करीत आहेत. त्यांच्या परिश्रमातून साधारण ७० टक्के रूग्ण बरे झाले आहेत. साहजिकच शहरातील या कोरोना योद्धाचे कौतुक केले जात आहे.कोरोना या महामारीने देशाबरोबरच संपूर्ण जगात हैदोस घातला आहे. विशेषत: राज्यात दिवसेंदिवस त्याचे मोठ्या प्रमाणात प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे. मुंबई महानगरामधील काही नामांकित रूग्णांलयांमध्ये असू रूग्ण उपचारासाठी दाखल होत आहेत. जे.जे. हॉस्पिटलमध्ये रूग्णांचा ओघ वाढला आहे. येथेच कार्यरत असलेले तळोद्याचे भूमिपूत्र एम.डी.मेडिसीन डॉ.योगेश्वर घनश्याम चौधरी हे गेल्या दीड महिन्यापासून कोरोना रूग्णांवर अविरत उपचार करीत आहेत. सुरूवातीला हे हॉस्पीटल या रूग्णांच्या उपचाासाठी निश्चित करण्यात आले.साहजिकच येथील मेडिसीन विभागाची जबाबदारीमुळे पुढे आलो. थोडासा ताण-तणावा बरोबर उत्सुकताही होती. कारण तेव्हा संरक्षणासाठी सुसज्ज असे कीट नव्हते. तरीही सोबत डॉक्टर, वैद्यकीय पथक तयार करून स्वत:ची व रूग्णांची काळजी घेत अशा रूग्णांवर उपचार सुरू केले. आतापावेतो जवळपास २५० ते ३०० रूग्णांवर उपचार केलेत. त्यातील जवळपास ७० टक्के रूग्ण बरे देखील झाले होते. मात्र धुम्रपानाच्या व्यसनाचे रूग्ण वाचविण्यात अपयश आल्याचेही ते सांगतात.कोरोना या महामारीने रूग्णांमध्ये अक्षरश: दहशत पसरविल्यामुळे रूग्ण उपचारासाठी दाखल होताना प्रचंड घाबरलेले असतात. नातेवाईकांचीही तशीच गत झालेली असते. सर्व प्रथम त्यांची भिती दूर करून त्यांचे समुपदेशन करतो. त्यामुळे उपचारासही चांगला प्रतिसाद मिळतो. कधी-कधी अतिशय गंभीर रूग्ण येतात. त्या वेळी ते खोकलतांना, शिंकतांना वातावरण प्रदूषित होऊ न देता आपल्या बरोबरच रूग्णांची काळजी घ्यावी लागते.साहजिकच यामुळे संक्रमणाची भिती मनात येते. मात्र देशापुढील संकट, व्यवसायावरील निष्ठा व रूग्णास देवासमान मानून अशा धोकेदायक परिस्थितीत काम करीत असल्याचे ते म्हणतात. एवढे कठोर परिश्रम घेऊनही काही वेळेस रूग्णास वाचविण्यात अपयशय आले तर अतिशय दु:खही होते. परंतु बहुसंख्य रूग्ण बरे होऊन रूगणालयातून घरी जातात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहतो. तेव्हा त्यांच्या चेहºयावरील हास्याचे समाधान वाटते. शिवाय हे रूग्ण शाबसकीने पाठ थोपटतात त्यावेळेस मनात उर दाटून येतो.कोरोना या महामारीच्या संक्रमणामुळे अशा रूग्णावरच उपचार करणाºया डॉक्टरांनाही तेवढाच धोका असतो. शिवाय काही ठिकाणी अशा संक्रमीत डॉक्टरांनादेखील बाधा झाली आहे. साहजिकच मरणालाच कवटाळावे लागत असते. अशा भयानक परिस्थितीमुळे प्रत्येक आई-वडिलांचे मन संवेदनशील बनते. परंतु डॉ.चौधरी यांचे आई-वडील त्यांना नेहमीच पाठबळ देत त्यांचा उत्साह वाढवित असतात. त्यामुळे आपल्यात रूग्णसेवेची उर्मी अधिकच भरते. प्रत्येक रूग्णांमध्ये आपण आपले आई-वडील, भाऊ, बहिण, नातेवाईक यांची प्रतिमा पाहून रोज १२ ते १६ तास काम करीत असल्याचे सांगतात