सारंगखेडा येथील शिबिरात ग्रामस्थांचे स्वॅब संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:26 IST2021-04-03T04:26:49+5:302021-04-03T04:26:49+5:30

सारंगखेडा येथील ग्रामपंचायत प्रांगणात फिरत्या पथकामार्फत १०० ग्रामस्थांच्या स्वॅबचे नमुने घेण्यात आले. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांनी ...

Swab collection of villagers in the camp at Sarangkheda | सारंगखेडा येथील शिबिरात ग्रामस्थांचे स्वॅब संकलन

सारंगखेडा येथील शिबिरात ग्रामस्थांचे स्वॅब संकलन

सारंगखेडा येथील ग्रामपंचायत प्रांगणात फिरत्या पथकामार्फत १०० ग्रामस्थांच्या स्वॅबचे नमुने घेण्यात आले. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागरिकांनी स्वत:ची काळजी स्वत: घेणे गरजेचे झाले आहे. सर्वच शासकीय व खासगी रुग्णालये फुल्ल असून, नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन जि.प.चे माजी सदस्य जयपालसिंह रावल यांनी केले. कोरोना नियमांचे पालन करून सर्दी, खोकला, ताप आल्यास त्वरित आरोग्य विभागाशी संपर्क करावा व स्वॅब देण्यासाठी पुढे येऊन वेळीच औषधोपचार करावा, असे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉ.कांतीलाल पावरा यांनी केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ.किशोर पाटील, स्वॅब संकलन पथकाचे समुदाय वैद्यकीय अधिकारी डॉ.जगदीश पाटील, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी सी.एम. पाटील, जुवेंद्र पाटील, आरोग्य सेविका सानप, आशा सेविका मीना कोळी यांच्यासह आरोग्य व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. सरपंच पृथ्वीराजसिंह रावल, ग्रामविकास अधिकारी संजय मंडळे यांनी सहकार्य केले.

कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता पुसनद येथे निर्जंतुकीकरण करण्यात येऊन ग्रामस्थांना सॅनिटायझर व मास्कचे वाटप करण्यात आले असून, कोरोना नियमांचे पालन करण्याबाबत जनजागृती करण्यात आली. ग्रामस्थांनी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे व कुणाला सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखी आदी लक्षणे असल्यास त्वरित स्वॅब देऊन तपासणी करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी सरपंच अनिल आगळे, उपसरपंच दिव्या चौधरी, ग्रामसेवक यू.एन. रौंदळ, प्रवीण चौधरी, महेंद्र गिरासे, पोलीस पाटील कृष्णा कोळी, दुर्योधन वाघ, ग्रा.पं.सदस्य दिलीप भिल, पंडित भिल, शरद पाटील, सखाराम भिल, गणेश मुसळदे, प्रकाश आगळे, आपसिंग शेमळे, दगा पवार आदींनी सहकार्य केले.

Web Title: Swab collection of villagers in the camp at Sarangkheda