लॉकडाऊनमध्ये वाढदिवस साजरा करणे भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2020 11:53 AM2020-07-07T11:53:29+5:302020-07-07T11:53:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार : तळोदा शहरालगतच्या एका वसाहतीमागील शेतात लॉॅकडाऊन काळात वाढदिवसाची पार्टी करणे ‘बर्थडे बॉय’ला महागात पडले ...

Surrounded by birthday celebrations in lockdown | लॉकडाऊनमध्ये वाढदिवस साजरा करणे भोवले

लॉकडाऊनमध्ये वाढदिवस साजरा करणे भोवले

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कोठार : तळोदा शहरालगतच्या एका वसाहतीमागील शेतात लॉॅकडाऊन काळात वाढदिवसाची पार्टी करणे ‘बर्थडे बॉय’ला महागात पडले आहे़ पोलीसांना गर्दी दिसून आल्यानंतर त्यांनी याठिकाणी छापा मारल्यावर हा प्रकार समजून आला होता़ ३ जुलै रोजी घडलेल्या या घटनेप्रकरणी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
तळोदा शहरालगत चंदनव्हिला अपार्टमेंट या रहिवासी वसाहतीमागे ३ जुलै रोजी गर्दी जमली असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती़ त्यानुसार निरीक्षक राजेश शिंगटे, सहायक पोलीस निरीक्षक अविनाश केदार, पोलीस नाईक रविंद्र कोराळे, पोलीस कॉन्स्टेबल अनिल पाडवी, रघुवंशी रामोळे यांनी याठिकाणी पाहणी केली असता, गर्दी दिसून आली होती़ दरम्यान पोलीसांची गाडी येत असलेली पाहून शेतात जमलेले १० ते १२ जणांनी पळ काढला होता़ पोलीस कर्मचारी कोराळे यांनी पाठलाग केल्यावर एकास ताब्यात घेण्यात आले होते़ त्याने गणेश सुरेश सोनार रा़ मेनरोड तळोदा अशी ओळख दिली होती़ त्याची विचारपूस केल्यास त्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्रकंपनी जमल्याची माहिती दिली़
घटनेची गांभिर्य लक्षात घेत साथ रोग कायद्याचे उल्लंघन व मनाई आदेशांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल अजय कोळी यांच्या फिर्यादीवरुन संशयित गणेश सोनार याच्याविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

या प्रकाराची तळोदा शहरात एकच चर्चा सुरू असून पोलीसांची गाडी असताना केक कापणे सुरू होते़ पोलीसांच्या भितीने केक न कापताच सर्वजण पळत सुटल्याची माहिती आहे़

Web Title: Surrounded by birthday celebrations in lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.