शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

संडे स्पेशल मुलाखत- शेतकऱ्यांनो पावसाचा अनुमान समजून घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2020 12:02 IST

बदलत्या हवामानाच्या परिस्थितीत छोट्या शेतकऱ्यांना टिकून राहयचे असेल तर त्यांनी खालील पंचसूत्रीचा प्रयोग करण्याची गरज आहे. - डॉ.गजानन डांगे

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कपर्यावरणाचा बदलात छोट्या शेतकºयांना टिकून राहायचे असेल तर त्यांनी पावसाचा अनुमान समजून घेणे आवश्यक असून बहूपीक पद्धत, शेतातच पाण्याचे नियोजन, बीज प्रक्रिया, जैविक खतांचा वापर आणि गटशेतीचा प्रयोग करण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन कृषीतज्ज्ञ डॉ.गजानन डांगे यांनी ‘लोकमत’शी बोलतांना केले. सध्या अक्षय कृषी परिवारातर्फे देशभरातील छोट्या शेतकºयांना प्रयोगशील व त्यांना प्रशिक्षीत करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभुमीवर या परिवारातील संस्थापक सदस्य म्हणून ते बोलत होते.पावसाचा अनुमान समजून घेण्यासाठी शेतकºयांनी काय केले पाहिजे?हा अनुमान समजून घेण्यासाठी प्रत्येक गावात त्या त्या गावातील मोबाईल माहिती चांगल्या प्रकारे जाणणारे किमान १० शेतकºयांनी एकत्र येवून त्यांनी कृषी विज्ञान केंद्राचा मोबाईल अ‍ॅडव्हायझरी सर्व्हीसेसशी जोडले गेले पाहिजे. त्यांच्याशी योग्य समन्वय साधल्यास आपल्या जिल्ह्यातील हवामानाचा अंदाज त्यांना मिळू शकतो.पाण्याचा नियोजनासाठी कुठले प्रयोग हवे?सध्या पाऊस बेभरवशाचा झाला आहे. दोन पावसातील अंतर किती राहील हे कुणी सांगू शकत नाही. यासाठी शेतकºयांनी आपल्या शेतालाच पाणलोटाचे स्वरूप देवून पावसाळ्यात पडणारा थेंब ना थेंब आपल्या शेतातच जिरवता येईल याचे तंत्र शिकले पाहिजे. त्यासाठी रोहयोची मदत घेवून माती वाहून जावू नये यासाठी बांध बंदीस्त नीट केले पाहिजे. कधी कधी पावसाची तीव्रता जास्त असते. त्यामुळे शेतातील माती वाहून जाते. आपण शरिरातील रक्त वाहू नये यासाठी जशी काळजी घेतो तशी माती वाहू नये यासाठी काळजी घेतली पाहिजे. त्याकरीता लगतच्या ८ ते १० शेतकºयांनी गट करून माती वाहू नये व पाणी आपल्या शेतातच जिरवण्यासाठी प्रयोग करावे.जैवीक अथवा सेंद्रीय खते शेतकºयांनी शक्यतोवर आपल्या घरीच बनविण्यासाठी प्रक्रिया समजून घेतली पाहिजे. ही खते जर स्वत:च बनविली तर खतांबाबत बाजारपेठेवर अवलंबून राहण्याची गरज भासणार नाही. खते घरीच तयार होणार असल्याने त्यातून खर्चाची बचतही होईल व जास्त उत्पादन घेण्याचे प्रयोगही करता येतील. याशिवाय बीज प्रक्रियाही प्रत्येक शेतकºयाने पेरणी पूर्वी केलीच पाहिजे. ही प्रक्रिया कृषी विज्ञान केंद्राकडून समजून घेतली पाहिजे. कारण सध्याच्या परिस्थितीत ही बाब महत्त्वाची झाली आहे.