विधी शाखेची परीक्षा कठीण गेल्याने भावी वकिलाची गळफास घेऊन आत्महत्या

By Admin | Updated: April 22, 2017 18:45 IST2017-04-22T18:45:47+5:302017-04-22T18:45:47+5:30

परीक्षेचे पेपर कठीण गेल्याच्या नैराश्येतून युवकाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मोलगी येथे घडली

Suicide by taking a future advocate for ritual exams | विधी शाखेची परीक्षा कठीण गेल्याने भावी वकिलाची गळफास घेऊन आत्महत्या

विधी शाखेची परीक्षा कठीण गेल्याने भावी वकिलाची गळफास घेऊन आत्महत्या

नंदुरबार, दि. 22 -  विधी शाखेच्या (एलएलबी) परीक्षेचे पेपर कठीण गेल्याच्या नैराश्येतून युवकाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना मोलगी येथे घडली.
गणेश रोता वळवी (25, रा.मोलगी, ता.अक्कलकुवा) असे मयत युवकाचे नाव आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गणेश हा विधी शाखेत शिकत होता. नुकतीच त्याची तिस:या वर्षाची परीक्षा झाली. त्यातील पेपर कठीण गेल्यामुळे आपण अनुत्तीर्ण होऊ अशी भीती त्याच्या मनात होती. त्यामुळे तो नैराश्येत होता. त्या नैराश्येतूनच त्याने आपल्या गावी  शेतात आंब्याच्या झाडाला गळफास घेतला. सकाळी सात वाजता ही घटना उघडकीस आल्यानंतर लागलीच मोलगी पोलिसांना कळविण्यात आले.  याबाबत रोता कालश्या वळवी याच्या खबरीवरून मोलगी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Suicide by taking a future advocate for ritual exams