शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारांना मत मागण्याची अशी घाई मतदारांच्या मागे शेताकडे निघाले पायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2021 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींमधील ४४९ उमेदवारांचा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आहे. गेल्या दोन दिवसांत ग्रामदैवतांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : तालुक्यातील २१ ग्रामपंचायतींमधील ४४९ उमेदवारांचा निवडणूक प्रचार अंतिम टप्प्यात आहे. गेल्या दोन दिवसांत ग्रामदैवतांच्या मंदिरात पूजन, महापुरुषांना अभिवादन करून कार्यकर्त्यांसमवेत गावागावांत जोरदार शक्तिप्रदर्शन सुरू आहे. यात काहींनी शेतशिवारही सोडले नसून एकही मतदार सुटायला नको म्हणून शेतात काम करणाऱ्या मजूर मतदारांच्या कामांच्या वेळेत जाऊन भेटी घेतल्या जात आहेत. तालुक्यात २७ ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम सुरू झाला होता. यातील सहा ग्रामपंचायती बिनविरोध होऊन २१ ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष मतदान होणार आहे. तत्पूर्वी गावोगावी प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. यातून गावागावांत ईर्ष्यचे व टोकाचे राजकारण पाहायला मिळत आहे. तो त्याचा, हा याचा ह्याच गप्पा पारावर रंगत आहे. त्यातून एकमेकांचे उणे-दुणेही निघत आहे. प्रत्येक मत महत्त्वाचे मानत पॅनेलप्रमुख व उमेदवार मतदारांची मनधरणी करीत आहे. आर्थिक तंगी तरीही. २०२० वर्षे हे विविध संकटांचे गेले, अनेकांचे होत्याचे नव्हते केले. शेतकरीही अस्मानी संकटाने पुरता हताश झाला. रब्बीवर आशा होती; परंतु अचानक दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. असे असले तरी ग्रामपंचायत निवडणूक असलेल्या गावांमध्ये उमेदवार आणि पॅनेलप्रमुखांनी खर्चाचा हात ढिला केला असल्याची बाब चर्चेचा विषय ठरत आहे. यातून गावोगावी होणाऱ्या आर्थिक उलाढालीचे आकडे वाढत जात असल्याने तालुकास्तरावरील नेत्यांचेही तोंडचे पाणी पळविले आहे. दरम्यान, एकीकडे आर्थिक उलाढाल हा महत्त्वाचा विषय असताना दुसरीकडे बामखेडा (ता. शहादा) येथील एका पॅनेलच्या प्रमुखांनी वेगळा पायंडा पाडून सर्वांना चकीत केले आहेत. पॅनेलप्रमुखांनी गावात ११ सदस्यांच्या हस्ते प्रत्येकी एक अशी ११ झाडे लावली आहेत. या वृक्षांची लागवड केल्यानंतर त्यांनी गावात प्रचार सुरू केला आहे. याच गावात एका पॅनेलमध्ये उच्चशिक्षित उमेदवारांचीही संख्या अधिक असून, यातील पती-पत्नी ग्रामस्थांचे आकर्षण ठरत आहेत.

तालुक्यात एकूण २७ पैकी सहा ग्रामपंचायती ह्या बिनविरोध झाल्या होत्या. या सहा ग्रामपंचायतीतील २३ प्रभागांत बिनविरोध सदस्य निवडून आले आहेत. यामुळे १५ रोजी २१ ग्रामपंचायतींच्या ६६ प्रभागांत निवडणूक कार्यक्रम होणार आहे. या ६६ प्रभागांमध्ये ४१ हजार ५७० मतदार मतदान करणार असल्याने त्यादृष्टीने प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे.