गाईड राज्य पुरस्कार परीक्षेत काणे हायस्कूलचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:21 IST2021-07-11T04:21:30+5:302021-07-11T04:21:30+5:30

या चाचणी शिबिरात प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा घेण्यात आल्या. प्रात्यक्षिकात गाठीचे प्रकार, बांधण्या, तंबू उभारणी, विविध खेळ, बिन भांड्याचा ...

Success of Kane High School in Guide State Award Examination | गाईड राज्य पुरस्कार परीक्षेत काणे हायस्कूलचे यश

गाईड राज्य पुरस्कार परीक्षेत काणे हायस्कूलचे यश

या चाचणी शिबिरात प्रात्यक्षिक व लेखी परीक्षा घेण्यात आल्या. प्रात्यक्षिकात गाठीचे प्रकार, बांधण्या, तंबू उभारणी, विविध खेळ, बिन भांड्याचा स्वयंपाक, ग्रिटिंग कार्ड तयार करणे, विविध स्पर्धा-परीक्षा घेण्यात आल्या. त्यात अनुश्री विपुल दिवाण, तनुष्का दिनेश वाडेकर, निशा निंबा चौधरी, वृषाली पाहुबा बागूल, वीणा संजयकुमार पाटील, ध्रुवी दिनेश पाटील, देवयानी रतन बडगुजर, तनिष्का लांबोळे, प्रियांशू किशोर चौधरी या विद्यार्थिनी उत्तीर्ण झाल्या. या विद्यार्थिनींना गाईड कॅप्टन स्वाती कुलकर्णी व सीमा गावीत यांचे मार्गदर्शन लाभले. नंदुरबार एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन गिरीश खुंटे, अध्यक्ष ॲड.परीक्षित मोडक, उपाध्यक्ष नरेंद्र सराफ, कार्यकारिणी सदस्य, मुख्याध्यापिका भारती सूर्यवंशी, पर्यवेक्षक विपुल दिवाण, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी यशस्वी विद्यार्थिनींचे कौतुक केले.

Web Title: Success of Kane High School in Guide State Award Examination