शहरं
Join us  
Trending Stories
1
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
2
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
3
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
4
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
5
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
6
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
7
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
8
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
9
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
10
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
11
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
12
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
13
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
14
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
15
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
16
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
17
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
18
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
19
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
20
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
Daily Top 2Weekly Top 5

दोन ठिकाणी यशस्वी तर एक ठिकाणी प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 12:21 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  शहरात दोन ठिकाणी घरफोडी झाली तर एका ठिकाणी प्रयत्न करणारा जेरबंद झाला. एका ठिकाणी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  शहरात दोन ठिकाणी घरफोडी झाली तर एका ठिकाणी प्रयत्न करणारा जेरबंद झाला. एका ठिकाणी सात हजार, दुसऱ्या ठिकाणी २७ हजाराचा ऐवज लांबविला. तर योगेश्वरी नगर भागात एकास चोरीचा प्रयत्न करतांना अटक करण्यात आली. या घटनांमुळे शहरात भितीचे वातावरण पसरले आहे.नंदुरबारातील गोकुळधाम परिसरात राहणारे सागरसिंग दिवल्या वसावे यांच्या घरात चोरी झाली. त्यांच्या फिर्यादीवरून राणूबाई काळूसिंग वसावे, रा.बारीसुगरस, ता.अक्कलकुवा यांनी वसावे यांचा बंद घराचा दरवाजाचे  कुलूप तोडून घरातील २२ हजार रुपये किंमतीचे चांदीचे कडे व पाच हजार रुपये रोख चोरून नेले. याबाबत सागरसिंग वसावे यांनी फिर्याद दिल्याने राणूबाई यांच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गवळी वाड्यात कुलूप तोडलेदुसरी घटना गवळीवाडा भागात घडली. शहरातील गवळीवाडा भागात घरफोडीत चोरट्यांनी सात हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गवळीवाड्यातील बंडू नाना गवळी हे रिक्षा चालवतात. त्यांच्या बंद घरातून चोरट्यांनी रोख सात हजार रुपये चोरून नेले. चोरट्यांनी कुलूप तोडून ही चोरी केली. या प्रकरणी परिसरात खळबळ उडाली आहे. बंडू गवळी यांनी फिर्याद दिल्याने शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार बहिरम करीत आहे. हातावर पोट असलेल्या कुटूंबाच्या घरात ही घटना घडल्याने हळहळ व्यक्त केली जात  आहे.एकाला अटकयोगेश्वरीनगर माळीवाडा भागात राहणारे धर्मेंद्र पांडूरंग पाटील यांच्या घरात एकाला चोरीच्या उद्देशाने घुसल्याने ताब्यात घेण्यात आले. राज नारायण थनवाल, रा.मेहतर वस्ती असे संशयीताचे नाव आहे. रात्री दोन वाजेच्या सुमारास राज थनवार हा धर्मेंद्र पाटील यांच्या घरात घुसला. आवाज आल्याने पाटील व परिवार उठले असता त्याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांना कळवून त्यांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास जमादार पाटील करीत आहे. दरम्यान, शहरात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत   आहे.