शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेस नेते पवन खेडा यांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा; मानहानी प्रकरणात अटकपूर्व जामीन मंजूर
3
एकच प्याला मृत्यूचा! वाढदिवसाच्या पार्टीच्या बहाण्याने जावयाला सासरी बोलावले, अन्..., असं फुटलं पत्नी अन् सासऱ्याचं बिंग    
4
Adani Group मध्ये मोठा फेरबदल! काय-काय बदलणार; गौतम अदानींचा प्लॅन काय?
5
टोल न घेता वाहनं सोडा.. एकनाथ शिंदेंचा आदेश; मुंबई-पुणे एक्सप्रेस वे ट्रॅफिक जामची घेतली दखल
6
खासदार नरेश म्हस्के यांच्या मुलाच्या विवाहसोहळ्यात संजय राऊतांची हजेरी; शिवसैनिक अवाक
7
"एका सहीनं तेलसाठा सुरक्षित करण्यासाठी पाकिस्तान हा काही भारत नाही," कियोसाकी यांनी Pak ला दाखवला आरसा
8
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर प्रचंड वाहतूककोंडी, वाहनांच्या लांब रांगा, सुप्रिया सुळेही अडकल्या..
9
व्हिएतनामवर निर्बंधांची टांगती तलवार! अमेरिकेच्या 'ब्लॅक लिस्ट'मध्ये भारतासह १० देशांचा समावेश; नेमकं प्रकरण काय?
10
"आपल्याला वाटलेलं काय सिनेमा बनवला असेल, पण...", 'राजा शिवाजी' पाहिल्यानंतर भारावली दिपाली सय्यद, रितेश देशमुखचं तोंडभरुन कौतुक
11
जबलपूर बोट दुर्घटना: बाळाला वाचवायला आईचे शर्थीचे प्रयत्न, शेवटपर्यंत उराशी कवटाळून ठेवले; पण...
12
ठाण्यातील पहिल्या इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण
13
नॅशनल पार्कमध्ये मॉर्निंग वॉकसाठी द्यावे लागणार १० हजार; ४५ रुपयांचा पास ५ हजारांना, नागरिकांचा संताप
14
ब्रिजभूषण सिंह भाजपावर नाराज, अखिलेश यादवांचं केलं कौतुक, निवडणुकीपूर्वी बदलणार पक्ष? चर्चांना उधाण 
15
'किंग'च्या सेटवरुन दीपिका-शाहरुखचा व्हिडीओ समोर, दुसऱ्या प्रेग्नंसीमध्येही शूट करतेय अभिनेत्री
16
भाजपा खासदार हेमंत सावरा यांच्या कारला ठाण्याजवळ अपघात; एअरबॅग्ज उघडल्याने वाचला जीव
17
स्ट्रेट ऑफ होर्मुझ नाही, तर स्ट्रेट ऑफ ट्रम्प... डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा स्टंट, शेअर केला नकाशा
18
धक्कादायक! बाथरुममध्ये लपून महिलांचे अंघोळ करतानाचे व्हिडीओ काढले, दोन क्रिकेटपटूंना अटक
19
Gold Silver Price Today 1 May: महिन्याच्या पहिल्या दिवशी चांदी ₹५००० नं महागली, सोन्याचे दर घसरले; पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K गोल्डचा भाव
20
पंतप्रधान, मंत्री, नेते अधिकारी, सर्वांच्याच मालमत्तेची होणार चौकशी, नेपाळमध्ये बालेन शाहांचा मास्टरस्ट्रोक
Daily Top 2Weekly Top 5

तब्बल ५४ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली भरारी पथके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2020 12:43 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बारावीची १८ फेब्रुवारी तर दहावीची ३ मार्चपासून सुरू होणाºया बोर्डाच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील ५४ अधिकाऱ्यांचा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बारावीची १८ फेब्रुवारी तर दहावीची ३ मार्चपासून सुरू होणाºया बोर्डाच्या परीक्षेसाठी जिल्ह्यातील ५४ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली भरारी पथके नेमण्यात आली आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावर एक पोलीस अधिकारी, तीन पोलीस व दोन होमगार्ड असा बंदोबस्त राहणार आहे. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा होईल यादृष्टीने नियोजन करण्याच्या सुचना जिल्हाधिकाºयांनी बैठकीत दिल्या.दहावी व बारावीच्या परीक्षांना लवकरच सुरुवात होणार आहे. कॉपीमुक्त वातावरणात परीक्षा व्हाव्या यासाठी जिल्हा प्रशासन आणि शिक्षण विभागाने नियोजन केले आहे. कॉपी रोखण्यासाठी तब्बल ५४ अधिकाºयांचा समावेश असलेली विविध भरारी पथके नेमण्यात आली आहेत. यासंदर्भात नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांनी नुकतीच बैठक घेवून आवश्यक त्या सुचना दिल्या. जिल्ह्यात दहावी व बारावी मिळून एकुण ७० परीक्षा केंद्र राहणार आहेत. प्रत्येक परीक्षा केंद्रावर तालुक्यतील अधिकारी यांना नियुक्ती देतांना त्यांचा तालुका बदल करण्यात यावा. भरारी पथकांमध्ये जिल्हाधिकारी, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य, माध्यमिक व प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिका यांचे भरारी पथक असावे तसेच एक महिला भरारी पथक देखील कार्यान्वीत राहणार आहे.केंद्रसंचालकांनी आपल्या केंद्रावरील उपकेंद्र संचालक, सहायक केंद्र संचालक, बिल्डींग कंडक्टर, पर्यवेक्षक, परीक्षार्थी यांच्याजवळ मोबाईल व तत्सम उपकरणे राहणार नाहीत याची काळजी घेतली जाणार आहे.प्रश्नपत्रिका वेळेत पोहचतील आणि त्या फुटणार नाहीत यासाठी वेगळी यंत्रणा कार्यान्वीत राहणार असून त्याचे नियोजन करण्यात येणार आहे. सर्वच केंद्रावर पुर्णवेळ बैठे पथक देखील कार्यान्वीत राहणार आहे. परीक्षा केंद्राच्या १०० मिटरच्या आत पालकांना येण्यास बंदी करणार असून तशा सुचना त्या ठिकाणी नियुक्त पोलीस कर्मचारी देण्यात येणार आहे. प्रांताधिकारी व तहसीलदार यांनी अचानक कुठल्याही परीक्षा केंद्रावर भेटी देणार आहेत. उपद्रवी केंद्रांवर तसेच इतर आवश्यक त्या केंद्रावर सीसीटीव्ही लावण्यासाठी सुचना देण्यात आल्या आहेत.जिल्हाधिकाºयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत माध्यमिक शिक्षणाधिकारी एम.व्ही.कदम यांनी परीक्षेच्या तयारीचा आढावा सादर केला. यावेळी सर्व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.४तालुकाअंतर्गत परीक्षा केंद्राचे पर्यवेक्षक अथवा दोन केंद्रात अदलाबदल करून नियोजन करण्यात येणार आहे. या पद्धतीला शिक्षकांनी सुरुवातीला विरोध केला, परंतु प्रशासन आपल्या निर्णयावर ठाम राहिले. तालुका बदल करण्यासंदर्भात मात्र यंदा निर्णय झालेला नाही.