बोराळे येथील एकाचा गळफास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2020 11:30 IST2020-06-23T11:30:36+5:302020-06-23T11:30:43+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : तालुक्यातील बोराळे येथील शशिकांत बापू पाटील (३०) या तरूणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या ...

The strangulation of one at Borale | बोराळे येथील एकाचा गळफास

बोराळे येथील एकाचा गळफास

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : तालुक्यातील बोराळे येथील शशिकांत बापू पाटील (३०) या तरूणाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेमुळे बोराळेसह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलीस सूत्रानुसार बोराळे, ता.शहादा येथील शशिकांत पाटील (३०) याने दारू व पत्नी नांदायला येत नाही या नैराश्यातून रविवारी रात्री गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली. दरम्यान, सारंगखेडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉ.राजेंद्र दुग्गड यांनी शवविच्छेदन केले. सुभाष बाबुराव पाटील यांच्या खबरीवरून सारंगखेडा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास हवालदार देविदास नाईक करीत आहेत. शशिकांत हा घरातला एकुलता एक होता. त्याला एक मुलगा असून, तोही पत्नी सोबत सुरत येथे राहत होता.

Web Title: The strangulation of one at Borale