शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
3
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
4
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
5
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
6
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
7
"कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीला गर्भधारणेसाठी सक्ती करू शकत नाही"; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
8
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
9
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
10
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
11
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
12
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
13
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
14
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
15
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
16
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
17
PM Modi: ‘झालमुडी मी खाल्ली, पण तिखट टीएमसीला लागले; पंतप्रधान मोदींचा ममता बॅनर्जींना टोला
18
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
19
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
20
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
Daily Top 2Weekly Top 5

जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांची मनमानी थांबवा, भटके-विमुक्त हक्क परिषद अध्यक्ष श्याम राजपूत यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:07 IST

यासंदर्भात राजेंद्र राजपूत यांनी महासंचालक जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय पुणे येथे निवेदन दिले आहे. यात २४ नोव्हेंबर २०१७ ...

यासंदर्भात राजेंद्र राजपूत यांनी महासंचालक जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालय पुणे येथे निवेदन दिले आहे. यात २४ नोव्हेंबर २०१७ रोजी निर्गमित करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार जात प्रमाणपत्र व वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी अर्जदाराच्या संबंधित नात्यांमध्ये वैधता प्रमाणपत्र उपलब्ध असल्यास तो महत्त्वाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरून इतर कोणताही पुरावा न मागता तत्काळ प्रमाणपत्र देण्यात यावे. जात प्रमाणपत्रासाठी अर्ज दाखल झाल्यानंतर अनुक्रमे ४५ दिवस व तीन महिन्यांच्या आत किंवा विशिष्टप्रकरणी पाच महिन्यांच्या आत सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून या विहित मुदतीत देण्याचे बंधनकारक केले आहे. तरी पडताळणी समित्यांकडून विनाकारण विलंब केला जातो आहे. मागासवर्गीय उमेदवारांना वैधता प्रमाणपत्र सहज व वेळेवर मिळावे यासाठी जिल्हावार जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांची निर्मिती करण्यात येऊन त्यांना अर्धन्यायिक अधिकार प्रदान करण्यात आले आहेत. त्यामुळे कायद्याचे पालन करणे बंधनकारक असतानादेखील सदर समित्या मात्र कायदेशीर मार्गाचा अवलंब न करता प्रकरणे गैर हेतूने त्रटीशिवाय किंवा ऐनवेळी थातूरमातूर त्रुटी दाखवून प्रलंबित ठेवत आहेत.

नियम १८ (५) अन्वये कोणतेही प्रकरण तीन महिन्यांच्या आत किंवा विशिष्टप्रकरणी पाच महिन्यांच्या आत निकाली काढण्याच्या नियमांची धुळे, जळगाव समित्यांकडून शासनाचा अंकुश नसल्यामुळे सर्रासपणे पायमल्ली होताना दिसून येत आहे. याविषयी पडताळणी समित्यांची शिखर संस्था अर्थात महासंचालक बार्टी कार्यालय पुणे यांच्याकडे असंख्य तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. २९ सप्टेंबर २०२० रोजी या संदर्भात राज्यमंत्र्यांनी वेबिनारद्वारे आढावा बैठक घेऊन एक महिन्याच्या आत प्रकरणे निकाली काढण्याचे आदेश देऊन ही या महत्त्वपूणे बाबीची दखल घेतली गेली नाही. हे दुर्दैवच म्हणावे लागेल. जात पडताळणी प्रकरणे प्रलंबित ठेवल्यामुळे सद्य:स्थितीत अनेक विद्यार्थ्यांना वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असल्यामुळे असंख्य अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित राहावे लागत आहे. त्रुटीच्या नावाखाली जाणून बुजून प्रकरणे प्रलंबित ठेवण्याऱ्या समितीच्या पदाधिकाऱ्यांवर आवश्यक ती कारवाई करण्यात यावी. जात वैधता प्रमाणपत्रासाठी सर्वसामान्यांना वेठीस धरण्यात येऊ नये. तसेच सख्या नातेसंबंधात समान न्याय तत्त्वाला हरताळ फासून मनमानी कारभार करणाऱ्या जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांची चौकशी होऊन याकामी पारदर्शकता आणावी. या प्रमुख मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या असून, सदर निवेदनावर भटक्या विमुक्त परिषदेचे तालुकाध्यक्ष राजेंद्र राजपूत व सचिव जालंधर भोई यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.