रस्त्यावरील काटेरी झुडपे काढण्यासाठी तहसीलदारांना निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:21 IST2021-07-10T04:21:57+5:302021-07-10T04:21:57+5:30

निवेदनात म्हटले आहे की, आमलाड ते बोरद रस्ता हा अपघाताचा रस्ता झाला आहे. बुधवारी याच रस्त्यावर झालेल्या अपघातात पाच ...

Statement to Tehsildar for removal of thorny bushes on the road | रस्त्यावरील काटेरी झुडपे काढण्यासाठी तहसीलदारांना निवेदन

रस्त्यावरील काटेरी झुडपे काढण्यासाठी तहसीलदारांना निवेदन

निवेदनात म्हटले आहे की, आमलाड ते बोरद रस्ता हा अपघाताचा रस्ता झाला आहे. बुधवारी याच रस्त्यावर झालेल्या अपघातात पाच जणांना दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामुळे पुढील अनर्थ किंवा अपघात टाळण्यासाठी या रस्त्यावरील काटेरी झुडपे काढण्यात यावेत. आमलाड ते बोरद रस्त्यावर मागील एक वर्षापासून काटेरी झुडपे प्रचंड प्रमाणात वाढले आहेत. त्यामुळे वाहन चालविण्यासाठी दुचाकीस्वारांना मोठी कसरत करावी लागत असून हा रस्ता हा मृत्यूचा सापळा बनला आहे. दररोज अपघात होऊन देखील बांधकाम विभाग निद्रिस्त अवस्थेत आहे. संबंधित विभागाला वेळोवेळी तोंडी सांगून व वृत्तपत्रात बातम्या प्रसिद्ध करून निदर्शनास आणून दिले आहे. तरीही या विभागाने दखल घेतलेली नसल्याने या विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदनाची दखल न घेतल्यास आंदोलन करण्यात येणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पुंडलिक राजपूत, भाजपचे तालुका उपाध्यक्ष मंगेश तनपुरे, योगेश चौधरी, परबत ठाकरे, सुधीर शिंदे, किरण पाडवी, नीलेश पाटील, सुरेंद्र पाडवी, रवींद्र पाटील, योगेश साळुंखे आदींच्या सह्या आहेत.

Web Title: Statement to Tehsildar for removal of thorny bushes on the road