गोवंशाची अवैध वाहतूक व कत्तल थांबवावी, गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:21 IST2021-07-11T04:21:23+5:302021-07-11T04:21:23+5:30

निवेदनात म्हटले आहे की, गोरक्षक आणि गौसेवक वेळोवेळी कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या अवैध वाहतुकीच्या विरोधात आवाज उठवतात. त्यावेळी प्रशासन तात्पुरत्या ...

Statement on Effective Implementation of Cow Slaughter Act | गोवंशाची अवैध वाहतूक व कत्तल थांबवावी, गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत निवेदन

गोवंशाची अवैध वाहतूक व कत्तल थांबवावी, गोवंश हत्याबंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत निवेदन

निवेदनात म्हटले आहे की, गोरक्षक आणि गौसेवक वेळोवेळी कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या अवैध वाहतुकीच्या विरोधात आवाज उठवतात. त्यावेळी प्रशासन तात्पुरत्या स्वरूपाची कारवाई करते त्यामुळे त्यावर पायबंद बसत नाही. प्रशासनाकडून कारवाई होत नसल्याने गौरक्षक स्वतःचा जीव धोक्यात घालून गोवंश वाचविण्याचा प्रयत्न करतात. ७ जुलै रोजी अवैध गोवंशाची वाहतूक करणारा ट्रकचा पाठलाग नंदुरबार ते विसरवाडी दरम्यान करताना गाडीतील गौतस्कर गाडी पकडली जाऊ नये म्हणून गाडीतून लाल मिरचीची पावडर गौरक्षकांवर फेकत होते. जेणेकरून गोरक्षकांचा अपघात व्हावा. नंदुरबार जिल्ह्यात या आठवडाभरात गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे पोलीस प्रशासनाला दिलेल्या माहितीमुळे चार ठिकाणी कारवाई करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार लक्षात घेता जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर गोवंशाची हत्येच्या उद्देशाने अवैध वाहतूक होत आहे आणि अशी गोवंशाची अवैध वाहतूक कायमच होते. यावर कायमस्वरूपी पायबंद घातला जावा. प्रशासनाने नंदुरबार जिल्ह्यातील सर्व तालुकांसह तातडीने उपाययोजना करून गोवंशाचा जीवाचे रक्षण करावे यासह विविध मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत. निवेदनावर हिंदू सेवा सहाय्य समितीचे डॉ.नरेंद्र पाटील, जिल्हा प्राणीक्लेश प्रतिबंधक सोसायटीचे सदस्य ॲड.रोहन गिरासे, विश्व हिंदू परिषदेचे अजय कासार, गोरक्षक भूषण पाटील, खुशाल भोई, धर्मसेवक मयूर चौधरी, सुमित परदेशी, शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे दिग्विजय ठाकरे आदींच्या स्वाक्षरी आहेत.

Web Title: Statement on Effective Implementation of Cow Slaughter Act