शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
4
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
5
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
6
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
7
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
8
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
9
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
10
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
11
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
12
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
13
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
14
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
15
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
16
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
17
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
18
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
19
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
Daily Top 2Weekly Top 5

रेमडेसिवीरच्या अनियमिततेबाबत कारवाईसाठी पथक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 04:29 IST

अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालय भारत सरकार आणि आयसीएमआरने कोविड १९ बाधित रुग्णांवर उपचारासाठी सुनिश्चित केलेल्या ...

अधिष्ठाता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांनी केंद्रीय आरोग्य मंत्रालय भारत सरकार आणि आयसीएमआरने कोविड १९ बाधित रुग्णांवर उपचारासाठी सुनिश्चित केलेल्या कार्यप्रणालीनुसार, रेमडेसिवीरचा वापर होत असल्याबाबत पथकामार्फत तपासणी करावी. जिल्ह्यातील सर्व रुग्णालयांनी या कार्यप्रणालीनुसार आवश्यक असलेल्या रेमडेसिवीर या औषधाच्या मात्राबाबत मागणी वितरक व सहा.आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांच्याकडे नोंदवावी. सहा.आयुक्त अन्न व औषध प्रशासन विभाग यांनी मागणीनुसार व रुग्णालयात असलेल्या गंभीर रुग्णांच्या संख्येनुसार खासगी रुग्णालयांना संबंधित मेडिकल दुकानामार्फत पुरवठा करावा.

रेमडेसिवीर हे औषध परस्पर नातेवाइकांना देण्यात येऊ नये. याबाबतचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्ती किंवा आस्थापनेविरोधात कडक कारवाई करण्यात येऊन परवाना निलंबित करण्यात येईल.

सहा.आयुक्तांनी रुग्णालयात पुरविण्यात आलेल्या मात्रा व वापर करण्यात आलेल्या मात्रांचा ताळमेळ घ्यावा व अनियमितता आढळल्यास संबंधितावर कारवाई करावी. सर्व रुग्णालयांनी वापरण्यात आलेल्या रेमडेसिवीरच्या रिकाम्या बाटल्या पारदर्शक पिशवीत तालुका आरोग्य अधिकारी यांच्याकडे जमा कराव्यात. बॅगेवर रुग्णालयाचे नाव, रुग्णाला पुरविण्यात आलेल्या मात्रांची संख्या, वापरण्यात आलेल्या मात्रांची संख्या, बॅगेतील रिकाम्या बाटल्यांची संख्या आदी तपशील असावा. रिकाम्या बाटल्यांचा अहवाल सहा.आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांच्याकडे सादर करण्यात यावा. रिकाम्या बाटल्याद्वारे विषाणूचा प्रसार होणार नाही, याची सर्व आस्थापनांनी दक्षता घ्यावी व त्यासाठी मेडिकल वेस्ट डिस्पोजल नियमानुसार कारवाई करावी.

नागरिकांनी कोरोनाचा संसर्ग झाल्यास घाबरून न जाता तज्ज्ञाकडून उपचार घ्यावेत व इतरांपासून स्वत:स अलग करावे. सरसकट तज्ज्ञाकडे आवश्यक नसलेल्या औषधाची मागणी करू नये. रुग्णाच्या स्थितीनुसार औषधाची मात्रा निश्चित करण्यात येत असते. रेमडेसिवीरबाबत कोणीही अफवा पसरवू नये व अफवांवर विश्वास ठेवू नये. अफवा पसरविणाऱ्या व्यक्तीवर दंडात्मक व फौजदारी कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.