शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना नियंत्रण आणि लसीकरणात आरोग्य कर्मचाऱ्यांची समर्पण भावना : डाॅ. बोडके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाने अहोरात्र मेहनत घेतली आहे. गाव पातळीवर आरोग्य केंद्रातील कर्मचारी झटले. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

जिल्ह्यातील कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य विभागाने अहोरात्र मेहनत घेतली आहे. गाव पातळीवर आरोग्य केंद्रातील कर्मचारी झटले. आता लसीकरण पूर्ण करण्यासाठी मेहनत घेतली जात आहे. प्रत्येक गावात जास्तीत जास्त लसीकरण व्हावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. विविध पथके त्यासाठी प्रयत्न करीत आहेत. जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यात कोरोना नियंत्रणासाठी जिल्हा परिषद आरोग्य विभागाचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. एन. डी. बोडके यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

कोरोना नियंत्रणात येऊ लागला, आता लसीकरणाचे आव्हान कसे पेलणार?

कोरोना नियंत्रणात ग्राम पातळीवर जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांनी मोठी मेहनत घेतली. आता लसीकरणासाठी हे कर्मचारी अहोरात्र परिश्रम घेत आहेत. लसीकरणासाठी आरोग्य विभागाने ९८ सेशन साईट तयार केल्या आहेत. १६ मोबाईल टीम गाव पातळीवर जाऊन लसीकरण करून घेत आहेत. ३० जीएनम कर्मचारी त्यासाठी नियुक्त केेले आहेत. ३० मिनी बसेसद्वारे कर्मचारी ने-आण केली जात आहे. लसींचा पुरेसा साठा असल्याने एकाही केंद्रावरून एकाही व्यक्तीला परत जाण्याची वेळ येत नाही.

आरोग्य केंद्रे ठरली आधार?

कोरोना काळात इतर आजारांसाठी ग्रामीण भागात आरोग्य केंद्र व उपकेंद्र ही जनतेसाठी मोठे आधार ठरली आहेत. शहरी भागात खासगी दवाखान्यांमध्ये येण्यासाठी नागरिक धजावत नव्हते. अशा काळात आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनी अशा रुग्णांना आधार देत त्यांना दिलासा दिला. कोरोना नियंत्रणाचे काम करताना आरोग्य कर्मचाऱ्यांनी आरोग्य केंद्रात ओपीडी सुरू ठेवून विविध आजारांवरील रुग्णांवर उपचार केले, ती एक आरोग्य विभागाच्या दृष्टीने समाधानाची बाब ठरली आहे.