सलग दुसऱ्या दिवशी विशेष रेल्वे रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2020 19:20 IST2020-05-06T19:20:39+5:302020-05-06T19:20:47+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : सतत दुसऱ्या दिवशी प्रशासनातर्फे उत्तर भारतात जाण्यासाठी दोन विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आली. ...

 Special train departed for the second day in a row | सलग दुसऱ्या दिवशी विशेष रेल्वे रवाना

सलग दुसऱ्या दिवशी विशेष रेल्वे रवाना

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : सतत दुसऱ्या दिवशी प्रशासनातर्फे उत्तर भारतात जाण्यासाठी दोन विशेष रेल्वे गाड्यांची व्यवस्था करण्यात आली. या गाड्यांनी बिहारमधील अररिया येथे १,२१० आणि पुर्णिया येथे १,२९० नागरिक आपल्या गावाकडे रवाना झाले. कालप्रमाणेच आजही चोख पोलीस बंदोबस्तात सोशल डिस्टन्सिंगचे काटेकोरपणे पालन करण्यात आले. रेल्वेने गेलेल्या नागरिकात नवापूर, शहादा, येथील मजूर व अक्कलकुवाच्या जामिया संकुलातील आणि शहादा येथील एका संस्थेतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. सकाळपासून विविध वाहनाने या सर्वांना रेल्वे स्थानकात आणण्याची व्यवस्था त्या त्या तहसीलद कार्यालयांतर्फे करण्यात आली होती.


’दोन्ही दिवस मिळून चार रेल्वे गाड्यांद्वारे आतापर्यंत ४,५१४ नागरिकांना बिहारच्या विविध भागात पाठविण्यात आले आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन व राज्य शासन बिहारच्या प्रशासनाशी सातत्याने संपर्कात होते.
’जिल्ह्याच्या इतर भागात अडकलेल्या स्थलांतरीत नागरिकांना त्यांच्या गावाकडे पाठविण्यासाठी प्रशासनातर्फे आवश्यक कार्यवाही करण्यात येत आहे.
’दोन व्यक्तीत विशिष्ट अंतर ठेऊन त्यांना रेल्वे गाड्यात बसविण्यात आले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर मास्क लावले होते.

Web Title:  Special train departed for the second day in a row