कुपोषीत बालकांचे लवकरच सर्व्हेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 12:27 IST2020-05-16T12:27:22+5:302020-05-16T12:27:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात पावसाळ्यापूर्वी सॅम व मॅम बालकांचे वजन घेवून सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी यंत्रणा ...

Soon survey of malnourished children | कुपोषीत बालकांचे लवकरच सर्व्हेक्षण

कुपोषीत बालकांचे लवकरच सर्व्हेक्षण


लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात पावसाळ्यापूर्वी सॅम व मॅम बालकांचे वजन घेवून सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी यंत्रणा कामाला लावण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी सांगितले. ‘लोकमत’ने शुक्रवारच्या अंकात याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.
लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यात सॅम व मॅम बालकांचे वजन घेतले गेले नाही. सोशल डिन्टन्सिंगचे कारण आणि आरोग्य व आशा सेविका कोरोनाच्या कामात गुंतल्यामुळे हे काम ठप्प होते. यामुळे कुपोषणाच्या आकडेवारीवर परिणाम झाला आहे.
याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी गौडा यांनी सांगितले, पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यात कुपोषीत बालकांचे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. आता परराज्यातून मजूर परत आले आहेत. त्यामुळे आता सर्व्हेक्षणावर आणि सॅम व मॅम बालकांच्या वजन घेण्यावर अधीक भर राहणार आहे. सध्या कोरोनाचे काम कमी झाले नसले तरी .
कर्मचाऱ्यांना थोडी उसंत मिळत आहे. त्यामुळे यंत्रणा आता कुपोषणाच्या सर्व्हेक्षणासाठी कामाला लावली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
अमृत आहार योजनेअंतर्गत योग्य व पुरेसा आहार नियमित दिला गेला आहे. लॉकडाऊनच्या काळात कुठेही याबाबत अडचण आली नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.


 

Web Title: Soon survey of malnourished children