‘सोनी वाईन’चा परवाना निलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 11:52 IST2020-05-05T11:52:51+5:302020-05-05T11:52:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मद्यसाठ्यात तफावत आढळल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोनी वाईन शॉपवर कारवाई केली होती़ तसेच ...

Sony Wine License Suspended | ‘सोनी वाईन’चा परवाना निलंबित

‘सोनी वाईन’चा परवाना निलंबित

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : मद्यसाठ्यात तफावत आढळल्याने राज्य उत्पादन शुल्क विभागाने सोनी वाईन शॉपवर कारवाई केली होती़ तसेच लॉकडाऊन काळात मद्यविक्री होणाऱ्या एका हॉटेलचा परवानाही निलंबित केला होता़ या दोन्ही कारवायांना योग्य ठरवत जिल्हाधिकारी यांनी सोनी वाईन व गजराज हॉटेल यांचे परवाने निलंबित केले आहेत़
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक युवराज राठोड यांनी माहिती दिल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी परवाने निलंबित करण्याची कारवाई केली होती़ १ मे रोजी जुनी पालिका चौकातील सोनी वाईन शॉपची राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने तपासणी केली असता साठ्यात तफावत आढळल्यानंतर पथकाने कारवाई करुन परवाना निलंबित केला होता़ तर कोरीट नाका परिसरातील हॉटेलमध्ये अवैध दारु विक्री सुरु असल्याचे दिसून आल्यानंतर पोलीस कारवाई झाली होती़ दोन्ही कारवायांनंतर सोमवारी जिल्हाधिकारी यांच्यासोबत माहिती देण्यात आली़ त्यांनी परवाने निलंबनाचा निर्णय कायम ठेवला आहे़
दरम्यान शहरासह जिल्ह्यातील अधिकृत वाईन शॉप उघडण्याची सकाळपासून आतुरतेने वाट बघितली जात होती़ परंतू एकही वाईन शॉप सुरु होऊ शकले नाही़ जिल्हाधिकारी यांनी याबाबत आदेशच काढलेले नसल्याने परवानाधारक विक्रेत्यांना दुकाने सुरु करता आली नाहीत़ मंगळवारी मद्याची दुकाने सुरु होण्याची शक्यता असून तसेच आदेश सोमवारी रात्री उशिरा काढले जातील अशी माहिती समजते़

Web Title: Sony Wine License Suspended