शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
2
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
3
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
4
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
5
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
6
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
7
मेट गालामध्ये करण जोहरचं पदार्पण, भारतीय संस्कृतीची झलक दाखवणारा पेहराव; लूकचं वैशिष्ट्य काय?
8
शेष होलो दीदीर खैला, भगबा होलो बांग्ला... विजयाची गंगा आली बिहारमधून बंगालमध्ये, ‘अंग, बंग अन् कलिंग’ मिशन यशस्वी
9
KKR चा वेगवान गोलंदाज दुसऱ्यांदा बनला आमदार; IPL पदार्पणातच किंग कोहलीचा त्रिफळा उडवला होता
10
आजचे राशीभविष्य ५ मे २०२६: नशिबाची साथ मिळेल, कार्यात यश प्राप्ती अन् आर्थिक लाभ होईल
11
बारामतीत सुनेत्रा पवार यांचा विक्रमी मताधिक्याने विजय; राहुरीत अक्षय कर्डिलेंचा विक्रमी विजय
12
अमेरिकेचा इराणला मोठा दणका! ६ युद्धनौका उद्ध्वस्त करत ‘होर्मुझची सामुद्रधुनी’ केली खुली
13
सर्वोच्च न्यायालयाचे ‘ते’ अधिकारी स्वत:ला सुपर सरन्यायाधीश समजतात; खंडपीठाचे कडक ताशेरे
14
'खेला' उधळला, कमळ फुलले ! भाजप २०० पार; तृणमूलमध्ये हाहाकार, काँग्रेस, डाव्यांची परिस्थिती शोचनीय
15
आसामचे ‘किंग’ हिमंताच! काँग्रेसचा ‘हात’ रिकामाच; एनडीए आघाडीची राज्यात सलग तिसऱ्यांदा सत्ता
16
अल्पवयीन मुली आणि स्त्रियांच्या सुरक्षिततेचा प्रश्न
17
एसआयआर पाच राज्यात भाजपसाठी ठरली अदृश्य ताकद! विजयाचे समिकरण नेमके कसे बदलले?
18
हे पंतप्रधान मोदींचे यश : मुख्यमंत्री; भाजप कार्यालयात ‘बंगाल’ विजयोत्सव
19
खेला होलो! बंगालमध्ये अखेर 'कमळ' फुलले! 'टीव्हीके'च्या रूपाने तामिळनाडूला मिळाला नवा नायक
20
दुर्मीळ ‘राजकीय स्टार्टअप’ ते बनला थेट ‘युनिकॉर्न’! देशातील फारच कमी पक्ष अल्पावधीतच ठरले यशस्वी
Daily Top 2Weekly Top 5

झाडांना आगी लावून लाकडाची तस्करी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2020 12:47 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोळदा ते खेतिया या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. ठेकेदाराने रस्ता रुंदीकरण करताना मोठ्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोळदा ते खेतिया या महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम प्रगतीपथावर आहे. ठेकेदाराने रस्ता रुंदीकरण करताना मोठ्या प्रमाणावर वृक्षांची कत्तल केली आहे. त्यातच या महामार्गावर काही हिरव्यागार व सुस्थितीत असलेल्या वृक्षांना लाकूड तस्कारांनी आगी लावल्यामुळे वृक्षसंवर्धनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत संबंधीत विभागाने वेळीच लक्ष देण्याची मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे.शहादा ते नंदुरबार मार्गावर अवैधपणे झाडे तोडून लाकडाची तस्करी करणाऱ्यांकडून विविध क्लृपत्या लढविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणजे झाडाच्या बुंध्याला आग लावून ते झाड पाडले जाते व रात्रीच्यावेळी आधुनिक हत्यारे वापरुन लाकूड लांबविले जाते. एकीकडे झाडे जगविण्यासाठी सर्वस्तरारून प्रयत्न होत असताना मात्र जी झाडे जगली आहेत, सावली देत आहेत त्यांना वाचविणार कोण? चांगल्या अवस्थेतील झाडे जाळून त्या लाकडाची तस्करी केली जात आहे. तरीही साधी कोणी विचारणा करताना दिसत नाही. झाडे लावण्यासाठी खूप प्रयत्न केले जातात. मात्र प्रत्यक्षात ते वाचविण्यासाठी कोणताही प्रयत्न होत नाही. झाडांच्या बुंध्याला आग लावतो कोण? याचा साधा तपासही कोणी घेत नाही रस्त्यावरील चांगली झाडे रात्रीतूनच आग लावून खाली पाडली जातात. हे पाडणारे व त्याची विल्हेवाट लावणारे कोण? याचा शोध घेण्याची गरज आहे. महामार्गावर दिवसाढवळ्या असा प्रकार घडत असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. सर्रास अवैधपणे वृक्षतोड करणाऱ्यांकडे वनविभाग व सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने लाकूड तस्करांचे फावले आहे. संबंधितांनी लाकड तस्करांवर कडक कारवाई करुन त्यांचा कायमस्वरुपी बंदोबस्त करण्याची मागणी पर्यावरणप्रेमींसह वाहनधारकांकडून केली जात आहे.झाडांच्या बुंध्यांना आग लावून त्या लाकडाची तस्करी करण्याचा प्रकार नवीन नसून दिवसाढवळ्या झाडांना आगी लावल्याचे चित्र महामार्गावर ये-जा करणाºयांना सहज दिसते. शहादा ते प्रकाशा रस्त्यावर हा प्रकार अनेकवेळा पहावयास मिळत आहे. गेल्या आठवडाभरात दोन ते तीन हिरव्यागार झाडांच्या बुंध्याला आगी लावण्यात आल्या. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे सर्वत्र शांतता आहे. याचाच फायदा हे लोक घेत आहेत.