शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : अशोक खरातकडील गुंगीचं औषध नेमकं काय? धागेदोरे शोधणार पोलीस; आणखी ५ दिवसांची पोलीस कोठडी
2
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
3
विस्डेनच्या यादीत भारतीयांचा बोलबाला, एकूण ७ पुरस्कारांवर कब्जा,दीप्ती, अभिषेक चमकले
4
इराणच्या अणुबॉम्बचा कच्चा माल रशियाच्या हाती? महासत्तांमध्ये रस्सीखेच सुरू; अमेरिका जप्त करण्याच्या तयारीत
5
बिहारच्या राजकारणात नवं समीकरण! भाजपाला पहिल्यांदाच मुख्यमंत्रिपद; सम्राट चौधरी घेणार शपथ, निशांत कुमार उपमुख्यमंत्री
6
पाकिस्तानला जमलं नाही ते जिनपिंग करून दाखवणार? इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी चीनचे ४ महाफॉर्म्युले!
7
IPL च्या पदार्पणातच दमदार कामगिरी; पहिल्या सामन्यासाठी प्रफुल हिंगेला किती मिळाली सॅलरी?
8
Royal Enfield: रॉयल एनफील्डची सर्वात महागडी बाईक; किंमत ऐकून थक्क व्हाल, तेवढ्यात तर येईल आलिशान कार!
9
Vastu Shastra: रोज दाराबाहेर रांगोळी काढता? त्यामुळे होणारे लाभ वाचून रांगोळीची सवय लावून घ्याल!
10
हृदयद्रावक! अमेरिकेत २६ वर्षीय भारतीय तरुणासोबत आक्रित घडलं; वाढदिवशीच झाला मृत्यू
11
१.२५ कोटी दे अन् घटस्फोट घे, ७ महिन्याच्या लग्नानं पतीचे निघाले दिवाळे; सुप्रीम कोर्टाचे कठोर आदेश
12
“१ मेपासून रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य, अन्यथा परवाने रद्द”: प्रताप सरनाईक
13
अमेरिका-इराण युद्धामुळे पेट्रोल-डिझेल महागणार? अमेरिकेनं सुरू केली नाकेबंदी; भारताला बसणार मोठा फटका?
14
Chanakya Niti: शत्रू समोरून वार करतो, पण मित्र पाठीमागून! धोका टाळण्यासाठी चाणक्य नीतीचे महत्त्वाचे नियम
15
नेस्को ड्रग्ज पार्टीचे कल्याण कनेक्शन; दोघांच्या मृत्यूनंतर ड्रग्ज देणाऱ्याला पहाटे अटक, तिसऱ्याचा शोध सुरु
16
“अभी तो सिर्फ ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है…”; मुंबईतून इराणचे अमेरिकेला थेट प्रत्युत्तर
17
NEFT vs RTGS vs IMPS vs UPI: पैसे ट्रांसफर करण्यासाठी कोणता पर्याय कधी वापरावा?
18
कोण आहेत पिरोजशा? ज्यांच्या हाती आली १२७ वर्ष जुन्या Godrej ची धुरा, १.५६ लाख कोटींचं आहे साम्राज्य
19
वडिलांनी मजुरी केली, दागिने विकून आईनं मुलासाठी बूट खरेदी केले; IPL मध्ये चमकला साकीब हुसैन
Daily Top 2Weekly Top 5

महिलेच्या गळ्यातून धूमस्टाईल सोनपोत लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2020 13:36 IST

 लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार :  शहरातील वृंदावन कॅालनीत मंदीरात दर्शनासाठी जाणा-या महिलेच्या गळ्यातून दुचाकीस्वार दोघांनी धूमस्टाईल सोनपोत लंपास केल्याची ...

 लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार :  शहरातील वृंदावन कॅालनीत मंदीरात दर्शनासाठी जाणा-या महिलेच्या गळ्यातून दुचाकीस्वार दोघांनी धूमस्टाईल सोनपोत लंपास केल्याची घटना घडली. ६० हजार रुपये किंमतीची दीड तोळे वजनाची सोनपोत  होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वृंदावन कॅालनीत राहणाऱ्या स्मिताबेन भरतकुमार शहा (६३)  या नेहमीप्रमाणे सकाळी साडेदहा वाजता जैन मंदीरात दर्शनासाठी जात होत्या. अहिंसा चौक ते मंदीर दरम्यानच्या रस्त्यावर कुणी नसल्याचे पाहून दुचाकीस्वार त्यांच्याजवळ आले. त्यांना काही कळण्याच्या आतच दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीने त्यांच्या गळ्यातील सोनपोत ओढून घेत पोबारा केला. स्मिताबेन यांनी आरडाओरड केला, परंतु दुचाकीस्वार भरधाव तेथून पसार झाले.  अहिंसा चौक व पुढे नळवा रस्त्याकडे दुचाकीस्वार पसार झाल्याचे सांगण्यात आले. दीड तोळे वजनाची व ६० हजार रुपये किंमतीची सोनपोत असल्याचे स्मिताबेन यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. याबाबत उपनगर पोलिसात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस निरिक्षक धनराज निळे करीत आहे. पोलिसांनी या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले असून धागेदोरे मिळाले असल्याचे सांगण्यात आले. लवकरच चोरट्यांना जेरबंद करण्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. दरम्यान, धूम स्टाईल जबरी चोरी करणारे चोरट्यांना प्रतिबंध करण्यात पोलिसांना यश आले होते. परंतु या घटनेमुळे हे चोरटे पुन्हा सक्रीय झाल्याचे चिन्हे आहेत. त्यामुळे पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळाव्या अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.