शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

पट्टेदार वाघाने उडवली दोन तालुक्यातील गावांची झोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2019 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवापुर तालुक्यातील गुजरात सिमेवर पट्टेदार वाघाचा संचार सुरु असल्याच्या वृत्ताने नवापुरसह नंदुरबार तालुक्यातील नागरिकांचीही ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : नवापुर तालुक्यातील गुजरात सिमेवर पट्टेदार वाघाचा संचार सुरु असल्याच्या वृत्ताने नवापुरसह नंदुरबार तालुक्यातील नागरिकांचीही झोप उडाली असून दर दिवशी ‘वाघ’ आला अशी आरोळी उठल्यावर गावांमध्ये धावपळ उडत आहे़ दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या अफवांमुळे वनविभागाची चांगलीच पंचाईत झाली असून कर्मचारी रात्री अपरात्री वनक्षेत्राऐवजी गावांमध्ये गस्त घालत आहेत़कोकणीपाडा ता़ नंदुरबार येथे जुलै २०१८ मध्ये पट्टेदार वाघ दिसून आला होता़ गुजरात राज्याच्या डांग जिल्ह्यातील पूर्णा अभयारण्यातून वाट चुकलेला हा वाघ पुन्हा अभयारण्यात परत गेल्याचे कोणतेही पुरावे नसल्याने तो याच भागात असल्याचा दावा सातत्याने होत आहे़ यातच गेल्या १० दिवसांपासून नवापुर तालुक्यात वाघ दिसत असल्याच्या अफवांना ऊत आला आहे़ यामुळे जनजीवनासह शेती व इतर व्यवसायांवर परिणाम झाला आहे़ परंतू दिसून येणारा प्राणी हा बिबट्या असल्याचे वनविभागाचे म्हणणे आहे़ नवापुर, चिंचपाडा आणि खांडबारा वनक्षेत्रात बिबट्याचा संचार असून या भागात बिबट्यांची संख्या आठच्या पुढे असल्याचे सांगण्यात आले आहे़ दरम्यान नंदुरबार तालुक्यात ठाणेपाडा आणि भादवड वनक्षेत्रात वाघाच्या संचाराची माहिती वनविभागाला देण्यात आली होती़ वनविभागाने शुक्रवार आणि शनिवार असे दोन दिवस गस्त केल्यानंतर त्याठिकाणी बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळून आले होते़नंदुरबार, नवापुर आणि शहादा या तीन तालुक्यात एकूण १ लाख ६१ हजार हेक्टर वनक्षेत्र आहे़ यातील चिंचपाडा आणि नवापुर हा परिसर २३ हजार तर खांडबारा वनक्षेत्र ९ हजार ३०० हेक्टर क्षेत्रात विस्तारले आहे़ गुजरात हद्दीला लागून असलेल्या या वनक्षेत्रात बिबट्यांची अधिक आहे़ यात पट्टेदार वाघ दिसत असल्याची माहिती वेळोवेळी देण्यात आली होती़ दोन महिन्यापासून नवापुर व चिंचपाडा या क्षेत्रात वाघाचा संचार सुरु असल्याचे सांगण्यात आले होते़ वनकर्मचाऱ्यांच्या पथकाने याठिकाणी भेटी देत पावलांचे ठसे घेण्यात आल्यानंतर ते बिबट्याचे असल्याचे सांगण्यात आले आहे़४कोकणीपाड्यातून मार्गस्थ झालेल्या वाघाच्या गळ्यात कॉलर नसल्याने तो ‘पूर्णा अभयारण्य’ किंवा इतर ठिकाणाहून आला याची माहिती मिळाली नव्हती़ हा वाघ परत न जाता चिंचपाडा वनक्षेत्रातच स्थिरावल्याचे जाणकारांचे म्हणणे असून वनविभागानेही त्याला दुजोरा दिला होता़ परंतू वाघ एवढा मोठा काळ एकटा राहू शकत नसल्याचे कारण वनविभागाने दिले आहे़ यामुळे वाघासोबत वाघीण असावी असा अंदाज आहे़नंदुरबार तालुक्यातील भादवड शिवारात शुक्रवारी रात्री बिबट्या दिसून आल्यानंतर नागरिकांची धावपळ उडाली होती़ हा प्राणी वाघच असल्याचे ग्रामस्थ ठामपणे सांगत होते़ परंतू पावलांच्या ठश्यांवरुन तो बिबट्या असल्याचे स्पष्ट झाले़ नंदुरबार-खांडबारा रस्त्यालगतही वाघ दिसल्याचे प्रवाशांकडून सांगण्यात आले होते़