शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
2
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
3
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
4
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
5
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
6
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
7
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
8
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
9
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
10
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
11
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
12
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
13
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
14
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
15
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
16
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
17
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
18
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
19
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
20
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
Daily Top 2Weekly Top 5

दीड वर्षांपासून सहा हजार विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:21 IST

ब्राह्मणपुरी : तालुक्यातील १७ आश्रमशाळेतील सहा हजार ३६९ विद्यार्थी शिक्षणाचे बळी ठरले आहेत. ‘ना पाटी, ना पुस्तक’ यामुळे आद्याक्षरे ...

ब्राह्मणपुरी : तालुक्यातील १७ आश्रमशाळेतील सहा हजार ३६९ विद्यार्थी शिक्षणाचे बळी ठरले आहेत. ‘ना पाटी, ना पुस्तक’ यामुळे आद्याक्षरे विसरलेले विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणापासून कोसो दूर असल्याचे चित्र शहादा तालुक्यात दिसून येत आहे.

तालुक्यामध्ये शासकीय १० अनुदानित सात असे एकूण १७ आश्रमशाळा आहेत. त्यामध्ये शासकीय आश्रमशाळेत प्राथमिक आश्रमशाळा एक, माध्यमिक आश्रमशाळा आठ तर उच्च माध्यमिक आश्रमशाळा एक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत असून, अनुदानित आश्रमशाळा सात अशा १७ आश्रमशाळेमध्ये सुमारे सहा हजार ३६९ विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेतात. मार्च २०२० पासून या आश्रमशाळा बंद आहेत. आश्रमशाळा बंद झाल्यानंतर विद्यार्थी आपापल्या गावी गेले आहेत. गरीब परिस्थितीतील व आर्थिकदृष्ट्या कमकुवत घटकातील या विद्यार्थाकडे प्रशासनाने म्हणावे तसे लक्ष दिले नाही. घरी गेल्यानंतर या विद्यार्थ्यांनी शेतातील कामे, रोजंदारी, मजूर इत्यादी मार्ग वापरला आहे. शिक्षणाच्या प्रवाहात आलेली ही मुले गावाकडे गेल्यानंतर शिक्षणातील आद्याक्षरे विसरली आहेत. या मुलांना शाळेत भोजन मिळायचे तेदेखील बंद झाले आहे. इतर शाळांमध्ये भोजनासाठी तांदूळ, डाळी व पौष्टिक अन्न मिळत होते, अशा पद्धतीच्या कोणत्याही सुविधा या विद्यार्थ्यांना नाहीत. परिणामी पोटाची खळगी भरण्यासाठी हे विद्यार्थी गावाकडे गेल्यानंतर मजुरीच्या कामाकडे वळले. या वेळी कोणी ऊसतोडीला गेले तर कोणी मोलमजुरी करू लागले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात आले आहे. एकीकडे शिक्षणाच्या प्रगतीकडे वाटचाल करीत असताना ऑनलाइन शिक्षण पद्धतीने शहरी भागांमध्ये विद्यार्थी इंटरनेटने जोडले. परंतु, ग्रामीण भागातील हे विद्यार्थी ज्यांनी आद्याक्षरे पुरेशी ओळखी नाही, त्यांना इंटरनेट काय असते, याबाबतची संकल्पना ही परिपूर्ण माहीत नाही. या विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे वाटोळे झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

कसले ऑनलाइन शिक्षण

एकीकडे इंग्रजी-मराठी शाळांनी मुलांना अँड्रॉइड मोबाइलद्वारे ऑनलाइन शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या. परंतु त्यांच्या घरात दारिद्र्य आहे.

पोटाची खळगी भरण्याचा संध्याकाळचा प्रश्न

या विद्यार्थ्यांना अड्रॉइड मोबाइल कोण देणार या विद्यार्थ्यांनी मात्र मजुरीचा रस्ता धरून शिक्षणापेक्षा पोटाच्या खळगी भरण्यास महत्त्व दिल्याचे चित्र दुर्गम भागात दिसत आहे.

शिक्षकांना शोधावे लागतात विद्यार्थी

एकीकडे ऑनलाइन शिक्षणाच्या पुरेशा सुविधा उपलब्ध नसल्याने आश्रमशाळेतील काही शाळांनी शिक्षकाला विद्यार्थाच्या घरी पाठवून वह्या पुस्तके देण्यात आले होते.

परंतु गावामध्ये शिक्षक गेल्यानंतर विद्यार्थी मात्र, मजुरीला किंवा शेताकडे गेल्याचे चित्र या शिक्षकांना पाहावयास मिळत आहे. ही शिक्षणाची झालेली दुरवस्था पाहून शिक्षक वर्गही हतबलतेने हे चित्र पाहत आहे.

आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण देण्यात येत असून, ज्यांच्याकडे मोबाइलची सोय नाही त्याठिकाणच्या आश्रमशाळेतील शिक्षकाकडून विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन शिक्षण दिले जात आहे. सध्या खावटी योजनेचे काम सुरू असल्याकारणाने आश्रमशाळेत भेट दिली जात नाहीय. - राजेंद्र मुसळे, शिक्षण विस्तार अधिकारी

शहादा तालुक्यातील शासकीय आश्रमशाळा

उच्च माध्यमिक शासकीय आश्रमशाळा,राणीपूर

शासकीय माध्यमिक आश्रमशाळा गणोर, सुलतानपूर, रामपूर, नवलपूर, शहाणा, चिरखान, चांदसैली, शहादा (ज्ञानेश्वरी), प्राथमिक आश्रमशाळा मलगाव