शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंधन वाचवा, वर्क फ्रॉम होम द्या", शाळांपासून लग्नापर्यंत, PM मोदींचे देशाला दुसऱ्यांदा सतर्कतेचे आवाहन
2
पंतप्रधान मोदींचा 'मिशन युरोप' आणि 'मिडल ईस्ट' दौरा; ५ देशांच्या दौऱ्यातून भारताची जागतिक ताकद वाढवणार!
3
मुंबईकरांसाठी मोठी बातमी! १५ मे पासून १० टक्के पाणी कपात; BMC प्रशासनाचा निर्णय, कारण...
4
विराट कोहलीला ‘बदनाम’ करण्यासाठी मला पैशांची ऑफर देण्यात आली; ‘त्या’ जर्मन मॉडेलचा धक्कादायक दावा
5
VIDEO: सोलापुरात भीषण स्फोट; गंधकाचा बॉक्स पडल्याने कर्मचाऱ्याचे दोन्ही पाय निकामी
6
भाजपने जिंकलेल्या 'त्या' ३१ जागांचे निकाल बदलणार? SIR वरुन कोर्टात गेलेल्या ममता बॅनर्जींना दाद मागता येणार
7
श्रेयस अय्यरची कडक फिफ्टी! मग ‘पहाडी लूक’मधील प्रीती झिंटाची खास झलक दिसली; व्हिडिओ व्हायरल
8
“सार्वजनिक-खाजगी भागीदारी तत्त्वावर ST उभारणार २०० चार्जिंग स्टेशन”: मंत्री प्रताप सरनाईक
9
कोण आहे Madhav Tiwari? गत हंगामात MI विरुद्ध पदार्पण, PBKS विरुद्ध पहिली ओव्हर टाकली अन् मैफील लुटली
10
फेरमोजणीत भाजप उमेदवाराचा विजय ठरला तात्पुरता; काँग्रेस उमेदवाराला सुप्रीम कोर्टाने पुन्हा केलं आमदार
11
CM होताच थलपती विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट; तामिळनाडूत नवी समीकरणे? चर्चांना उधाण
12
भन्नाटच... आता AI सांगणार तुमचे तिकीट कन्फर्म होणार की नाही? रेल्वेने सगळी सिस्टीमच बदलली
13
प्रियांश आर्यचा स्फोटक अवतार; मिचेल स्टार्कची जिरवली! मोजक्या खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचंही नाव
14
“रिजेक्टेड माल…, संपूर्ण देशाने राहुल गांधींना नाकारले आहे”; CM देवेंद्र फडणवीसांचा पलटवार
15
आधी लढवय्या खेळीची चर्चा! आता ‘जखमी वाघ’ क्रुणाल पांड्यानं शेअर केलेल्या पोस्टनं वेधलं लक्ष
16
राष्ट्रीय सुरक्षा ते आरोग्य; सुवेंदू अधिकारी यांचे पहिल्या मंत्रिमंडळ बैठकीचे ५ मोठे निर्णय
17
“आता दुसरे दादा होणे नाही, पण त्यांनी दिलेली दूरदृष्टी घेऊन काम करत राहणार”: सुनील तटकरे
18
कोण आहे राज सिंग उर्फ ​​चंदन? सुवेंदू अधिकारींच्या PAच्या हत्या प्रकरणात झाली अटक
19
“कोकण ही साक्षात देवभूमी, महाराष्ट्राच्या विकासाचा कणा”; सुनेत्रा पवारांचे कौतुकास्पद उद्गार
20
केदारनाथवरुन परतताना ट्रेनमधून कुठे गायब झाली 'ती'? स्वत:च सांगितली ६ दिवसांची मिसिंग मिस्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात सहा प्रकल्प ओव्हरफ्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 12:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नंदुरबार व नवापूर तालुक्यातील अनेक प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. परंतु शहादा तालुका आणि नंदुरबार ...

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नंदुरबार व नवापूर तालुक्यातील अनेक प्रकल्प ओव्हरफ्लो झाले आहेत. परंतु शहादा तालुका आणि नंदुरबार तालुक्यातील पूर्व भागातील प्रकल्पांमध्ये अद्यापही अपेक्षीत पाणीसाठा झाला नसल्याचे चित्र आहे.
जिल्ह्यात १५ दिवसांपर्यंत पावसाची तूट ३५ टक्केपर्यंत होती. ती गेल्या १० दिवसात भरून निघाली आहे. गेल्या आठवड्यात जिल्ह्यात पावसाची संततधार होती. काही भागात मुसळधार पाऊस झाला. तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होता. नवापूर तालुक्यात एकाच दिवसात १४० मि.मी.पावसाची नोंद झाली होती. त्याचा परिणाम चांगला झाला आणि नवापूर तालुक्यातील पूर्व भाग तसेच नंदुरबार तालुक्यातील पश्चिम भागातील नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले. त्याचा परिणाम लघु व मध्यम प्रकल्प तुडूंब भरले. नंदुरबार तालुक्यातील आणि नवापूर व साक्री तालुक्यातील सिमेवर असलेल्या धनीबारा, खोलघर, आंबेबारा हे प्रकल्प ओसंडून वाहू लागले. याच भागातील तसेच नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणारा विरचक मध्यम प्रकल्प देखील ७५ टक्केपेक्षा अधीक भरला. या प्रकल्पात पाण्याची आवक सुरूच असल्याने प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे.
नवापूर तालुक्यातीलच मध्यम प्रकल्प असलेला रंगावलीतही ९० टक्केपर्यंत पाणीसाठा झाला आहे. शहादा तालुक्यातील दरा प्रकल्पात ७५ टक्के पाणीसाठा झाला आहे. याशिवाय शिरवे, ता.नवापूर, खैरवे, ता.नवापूर, धनपूर, ता.तळोदा, वाघदी, ता.नवापूर, भुरीवेल, ता.नवापूर, राणीपूर, ता.शहादा आदी प्रकल्पांमध्येही ८० टक्केपेक्षा अधीक पाणीसाठा झाला आहे.
अद्याप पावसाळ्याचा दीड महिना बाकी आहे. या काळात सरासरीएवढा पाऊस झाला तरी जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा हा सरासरी ८० टक्केपेक्षा अधीक राहील अशी शक्यता आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना ते फायद्याचे ठरणार आहे.