शहरं
Join us  
Trending Stories
1
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
2
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
3
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
4
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
5
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
6
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
7
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
8
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
9
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
10
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
11
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
12
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
13
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
16
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
17
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
18
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
19
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
20
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

सात दिवसात २४ पोल्ट्रीत पावणेसहा लाख कोंबड्या नष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 12:01 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : नवापूर तालुक्यात फेब्रुवारी २००६ नंतर दुसर्‍यांदा ६ फेब्रुवारी २०२१ ला बर्ड फ्लू चा शिरकाव ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : नवापूर तालुक्यात फेब्रुवारी २००६ नंतर दुसर्‍यांदा ६ फेब्रुवारी २०२१ ला बर्ड फ्लू चा शिरकाव झाल्याने आठवड्याभरात राज्यातील सर्वात मोठे किलिंग ऑपरेशन नवापूरातील २४ पोल्ट्रीत राबविण्यात आले. यात एकूण ५ लाख ७८ हजार ८९० कोंबड्या नष्ट केले तर २५ लाख १३ हजार ३९२ अंडी नष्ट करण्यात आली आहे. उर्वरित पाच पोल्ट्रीतील किलिंग ऑपरेशन पुढील आदेश आल्यावर मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार मंदार कुलकर्णी यांनी दिली. नवापूर शहरातील २४ पोल्ट्री फॉर्म मध्ये लाखो कोंबड्या व अंडी नष्ट करण्यात आली आहे. बर्ड फ्यू ग्रस्त परिसरातील पोल्ट्रीत निर्जंतुकीकरण करण्याचे काम काही व्यवसायिकांनी सुरू केले आहे. तर काही व्यवसायिकांनी निर्जंतुकीकरणाचा कामाला अजून सुरुवात केलेली नाही पोल्ट्री फार्म मधील पडलेली विष्टेत पाणी साचल्याने विष्टा कुजते किडे पडतात. ते खाण्यासाठी बगळे, कावळे इतर पक्षी येत असतात त्यातून  इतर पक्षांना बर्ड फ्लूची लागण होऊ शकते या संदर्भात पोल्ट्रीतील विष्टा पडलेल्या भागामध्ये जाळीने पूर्ण बंदिस्त करणे गरजेचे आहे.असे तज्ज्ञ म्हणतात परंतू काही पोल्ट्रीत जाळ्या नादुरुस्त अवस्थेमध्ये दिसून आले आहेत. तेथे पक्षी शिरतात. त्यापासून धोका होऊ शकतो. प्रशासनाचे किलिंग ऑपरेशनाचे काम झाले असेल तरी योग्य उपाययोजनांबाबत पोल्ट्रीत व्यावसायिकांना मार्गदर्शन करणे गरजेचे आहे असे बोलले जात आहे. नवापूर परिसरातील पोल्ट्रीतील लाखो कोंबड्या नष्ट करण्यात आल्या असल्या तरी १० किलोमीटर त्रिज्येतील तालुक्यातील करंजी खुर्द, वाकीपाडा, विजापूर, लहान चिंचपाडा, एक किलोमीटर मधील गाव,जामने, जामतलाव, घोडजामने, कोठडा, काळंबा, मावचीफळी, किलवणपाडा, तीन किलोमीटर अंतरावरील गाव नांदवण, बेडकीपाडा, बंधारफळी पाच किलोमीटर अंतरावरील गाव,रायंगण, रायपुर, बोकळझर, पायरविहीर, गडद, बिलमांजरे बंधारपाडा, आमपाडा या दहा किलोमीटर त्रिज्येतील गावातील देशी कोंबडी बदक व इतर पक्षी टप्प्याटप्प्याने जमा करण्यासाठी केवळ पहिल्या दिवशी ग्रामीण    भागात दवंडी फिरवण्यात आली    होती. पुढे ग्रामीण भागात काय   करवाई होईल याबाबत संभ्रम     कायम आहे. ग्रामीण भागातील ग्रामसेवक व तलाठी यांची टिम      तयार करण्यात आली होती. ग्रामीण भागात कोंबड्यांची मरतूक नाही   आहे. कोंबड्या जमा  व नष्ट करू नका असे सांगण्यात आले होते. तूर्त ग्रामीण भागातील पक्षी संकलन देखील थांबण्यात आले आहे. पुढे शासन काय निर्णय घेता हे नंतरच कळले. २००६ मध्ये नवापुर शहरातील पाळीव पक्षी पोपट, कबुतर व इतर पक्षी जमा करण्यात आले होते. यंदा मात्र या पक्ष्यांबाबत काहीही कार्यवाही झाली नाही.