शहरं
Join us  
Trending Stories
1
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये १५ बूथवर पुन्हा मतदान; निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
2
रिझर्व्ह बँकेने लंडनमधून परत मागवले तब्बल १ लाख किलो सोनं, कारण काय?
3
समुद्रात अडकले ४१ टँकर, अमेरिकेने केली इराणची नाकेबंदी, पण तिकडे चीनची झाली कोंडी 
4
“अजितदादांचा पक्ष मविआत येऊ शकतो अन् २०२९ला बारामतीचा आमदार…”; युगेंद्र पवारांचा मोठा दावा
5
महाराष्ट्र दिनी राज ठाकरेंची हुतात्मा स्मारकाबाबत पोस्ट; मराठी माणसाला आवाहन, सरकारवर टीका
6
‘मिसिंग लिंक’ नाही, मग आता काय म्हणायचे?; विशेष मार्गिकेला CM फडणवीसांनी दिले नवीन नाव
7
Travel : ना मोबाईल नेटवर्क, ना विजेचा झगमगाट! तरीही पर्यटकांची धाव; तुम्हाला माहितीये का 'हे' अनटोल्ड डेस्टिनेशन?
8
महाराष्ट्रदिनी PM मोदी यांचे CM फडणवीस यांना खास पत्र, नेमकं काय म्हटलंय? वाचा
9
नवमपंचम विपरीत राजयोग २०२६: ९ राशींना लक्षणीय लाभ, नवीन नोकरीची संधी; कष्टाचे चांगले फळ!
10
जुना एसी दुरुस्त करावा की नवा विकत घ्यावा? 'हे' पॉईंट्स वाचून निर्णय घ्या, वाचतील हजारो रुपये!
11
३ देशांतून तातडीने बाहेर पडा! UAEची नागरिकांना सूचना; सावधगिरीची इशारा की युद्धात उडी?
12
“महाराष्ट्राचे राजकीय महत्त्व कमी करायचा प्रयत्न, सरकारने आत्मपरीक्षण करावे”: हर्षवर्धन सपकाळ
13
माणुसकीला काळिमा! १२ वर्ष सिगरेटचे चटके, मग घटस्फोट देऊन घराबाहेर काढलं; हैवान पतीचा क्रूर चेहरा समोर
14
“महाविकास आघाडीने विकासाची लिंक मिस केली, आम्ही ती वेगाने कनेक्ट केली”: DCM एकनाथ शिंदे
15
लग्नाचे विधी सुरू होणार तोच पथक दारात! परभणीत बालविवाह रोखला; अल्पवयीन मुलीची बाल कल्याण समितीकडे रवानगी
16
कृणाल पांड्याला गोलंदाजी का दिली नाही? भुवीने सांगितलं अजब कारण; पाहा तुम्हाला तरी पटतंय का?
17
मी माफी मागतो...! एक्स्प्रेस वेवरील वाहतूक कोंडीबद्दल मुख्यमंत्र्यांची दिलगिरी; सुप्रिया सुळेंना दिला खास संदेश
18
सुट्ट्यांचा आनंद महामार्गावरच 'जाम'! खेड शिवापूर ते साताऱ्यापर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा; प्रवासी हतबल
19
धावत्या बसचे चाक बाहेर निघाले, साकोली जवळ मोठा अपघात टळला!
20
भोंदू खरातने परिसाची शक्ती प्राप्त करण्याचे सांगून फिर्यादीच्या पैशातून केला २१ देशांचा परदेश दौरा!
Daily Top 2Weekly Top 5

तळोदा प्रकल्पांतर्गत आश्रमशाळांमध्ये ३० हजार विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2020 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रांझणी : तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत ६३ शासकीय तसेच विनाअनुदानित आश्रमशाळा आणि १७ वसतीगृहात शिक्षण ...

लोकमत न्यूज नेटवर्करांझणी : तळोदा एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पांतर्गत ६३ शासकीय तसेच विनाअनुदानित आश्रमशाळा आणि १७ वसतीगृहात शिक्षण घेत असलेल्या ३० हजार विद्यार्थ्यांची सिकलसेल तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे़ यामुळे सिकलसेल ग्रस्त विद्यार्थ्यांची निश्चित संख्या समोर येऊन उपचार शक्य होणार आहेत़सातपुड्याच्या दुर्गम भागासह तळोदा तालुक्याच्या विविध भागात लहान बालकांमध्ये सिकलसेलचा फैलाव होण्याचे प्रमाण वाढीस लागत आहे़ यावर पर्याय म्हणून त्यांच्या तपासण्या करुन नियमित औषधी घेणे गरजेचे आहे़ परंतू आश्रमशाळांमध्ये निवासी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना हे शक्य होत नसल्याचे प्रकार समोर आले आहेत़ काही विद्यार्थ्यांच्या जीवावरही बेतल्याचे चित्र निर्माण झाले आहे़ यातून मार्ग काढत प्रकल्प कार्यालयाने ३० हजार ५४१ विद्यार्थ्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे़ यासाठी नुकतीच प्रकल्पाधिकारी अविशांत पांडा यांच्या यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली़ यावेळी तळोदा तालुका आरोग्य अधिकारी डॉ़ महेंद्र चव्हाण, अक्कलकुवा तालुका आरोग्याधिकारी डॉ़ स्वप्नील मालखेडे, धडगाव तालुका आरोग्याधिकारी डॉ़ दिनेश बढे, राष्ट्रीय बालस्वास्थ वैद्यकीय अधिकारी डॉ़ वंदना पाटील, वैद्यकीय अधिकारी सुनील लोखंडे, परेश चावडा, माझगाव डॉकचे सीएसआर प्रबंधक रोहित पंड्या, जिल्हा सिकलसेल समन्वयक उमेश शिंदे आदी उपस्थित होते़ या बैठकीत ४२ शासकीय आश्रमशाळांमधील १८ हजार १ विद्यार्थी, २१ अनुदानित आश्रमशाळांमधील १ हजार १०१ विद्यार्थी व १७ शासकीय वसतीगृहात शिक्षण घेणारे १ हजार ५५० विद्यार्थी यांची तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती प्रकल्पाधिकारी पांडा यांनी दिली़ माझगाव डॉक व आरोग्य विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम होणार असल्याची माहिती यावेळी उपस्थितांना देण्यात आली़दरम्यान एकीकडे तपासणी होणार असल्याने दुसरीकडे धुळे जिल्ह्यातील अनुदानित आश्रमशाळेत शिक्षण घेणाºया तळोदा तालुक्यातील सिकलसेलग्रस्त विद्यार्थिनींना परत पाठवण्याचे प्रकार झाले आहेत़ याकडे तळोदा प्रकल्प कार्यालयाने लक्ष देऊन सिकलसेलग्रस्त विद्यार्थिनींचा शोध घेऊन येथेच व्यवस्था करण्याची मागणी आहे़