शहाद्यात दुकान फोडून चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2020 12:24 PM2020-02-14T12:24:19+5:302020-02-14T12:24:26+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : येथील के.एस.मार्केटमधील मोबाईल दुकानातून चोरट्यांनी १८ हजार रुपये रोख आणि तीन हजारांचा मोबाईल चोरून ...

Shoplifting broke into the martyrdom | शहाद्यात दुकान फोडून चोरी

शहाद्यात दुकान फोडून चोरी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शहादा : येथील के.एस.मार्केटमधील मोबाईल दुकानातून चोरट्यांनी १८ हजार रुपये रोख आणि तीन हजारांचा मोबाईल चोरून नेल्याची घटना घडली.
के.एस.मार्केटमधील मोबाईल दुकानाचे चोरट्यांनी शटर उचकवून आत प्रवेश केला. दुकानातील गल्ल्यात ठेवण्यात आलेले १८ हजार रुपये रोख आणि तीन हजार रुपयांचा डेमोचा मोबाईल चोरट्यांनी लंपास केला. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांना कळविण्यात आले. पोलिसांनी पंचनामा केला. याबाबत दुकान मालक योगेश सुरेशचंद्र शर्मा यांनी फिर्याद दिल्याने शहादा पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस नाईक विनोद नाईक करीत आहे. दरम्यान, पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.

Web Title: Shoplifting broke into the martyrdom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.